Gold Price Today
Gold Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Price Today: एकाच दिवसात सोने ७५० ने वाढले; चांदीत दुप्‍पटीने वाढ

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सोने चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सोन्याच्या दरात साडेसातशे रूपयांची तर चांदीच्या (Gold And Silver) दरात पंधराशे रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांचा विचार केल्यास सोन्याच्या दरात (Gold Price Today) बाराशे रूपयांची तर चांदीच्या दरात चार हजारांची वाढ (विना जीएसटी) झाली आहे. (Live Marathi News)

अमेरिकेच्या मुख्य बँक फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा एकदा व्याज दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या अखेरीस फेडरल रिझर्व्हकडून शेवटची दरवाढ केली जाईल, असा अंदाज आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठत सोने दरवाढीवर होत आहे. लग्न सराई, सोन्याला वाढती मागणी यामुळे सोन्याचे दर वाढताहेत.

जळगावचे (Jalgaon) सोने शूध्द असल्याने त्याला देशभर मागणी आहे. दिवाळीनंतर सातत्याने सोने, चांदीच्या दरात वाढ होत आहे. एक डिसेंबरला सोन्याचे दर प्रती तोळा ५३ हजार (विना जीएसटी) होते. तर चांदी ६४ हजार (विना जीएसटी) होते.तर आजचे दर सोने ५४ हजार २०० तर चांदीचे दर ६८ हजारांवर पोचले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मतदार केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT