Gold Price Saam tv
महाराष्ट्र

Gold Price: सोने ६० हजारांवर, तरीही गुढीपाडवा मुहूर्त साधला

सोने ६० हजारांवर, तरीही गुढीपाडवा मुहूर्त साधला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात असते. दोन दिवसांपुर्वी सोन्‍याचे दर ६० हजाराच्‍या वर पोहचले असून आजच्‍या मुहूर्तावर अनेकांनी (Gold) सोने-चांदीची खरेदी केली. यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाल्‍याचे पहावयास मिळाले. (Live Marathi News)

सोने- चांदी खरेदीला अनेकजण प्राधान्य देत असतात. यात साडेतीन मुहूर्तापैंकी गुढीपाडवा सणाचा मुहूर्त त्यासाठी उत्तम मानला जातोया दरम्‍यान मागील १० – १२ दिवसांत सोने- चांदीचे भाव वाढत असले तरी सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे. गुढीपाडवा सणाच्या दोन दिवस अगोदरच (Gold Price Today) सोने ६० हजारांच्या पुढे गेल्याने मुहूर्तावर भाववाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. असे असले तरी ग्राहकांना दर कमी होण्याचा सुखद धक्का अपेक्षित आहे.

मुहूर्ताला खरेदी हमखास

गुढीपाडव्याच्या सुरवातीला सोने ६० हजाराच्‍या वर पोहचले (Jalgaon News) होते. परंतु, २१ मार्चला सोन्याच्या दरात ७०० रुपयांची घसरण होऊन ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. तरी देखील या मुहूर्तावर खरेदी जोरात होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला होता. त्‍यानुसार आजचा दिवस राहिल्‍याचे पहावयास मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

पाकिस्तान हादरलं! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, २३ पेक्षा जास्त जवान ठार

Hair Care: फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका! हेअर केअर रुटीनमध्ये 'या' ७ गोष्टींचा करा समावेश, केस होतील मऊ आणि शाइनी

SCROLL FOR NEXT