Gold Silver Price Saam tv
महाराष्ट्र

आठवड्यातच सोने– चांदी तीन हजाराने महामगले; रशिया-युक्रेनच्या युद्धाचा परिणाम

आठवड्यातच सोने– चांदी तीन हजाराने महामगले; रशिया-युक्रेनच्या युद्धाचा परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रशिया व युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. याचा परिणाम सोने, चांदीच्या बाजारावर झाला आहे. युध्दामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजतर चांदीचे दर ७० हजारांवर (प्रतिकिलो) पोचले आहे. नुसतेच चांदी नाही तर या आठवड्यात सोने (Gold) व चांदीचे दर तीन हजाराने महागले आहे. (jalgaon news Gold and silver rose by three thousand in a week russia Ukraine war impact)

रशिया व युक्रेनमधील युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम शेअर बाजाराबरोबरच तेल, सोने, चांदी आदी वस्तूवर होत असून त्यांच्या किंमती वाढतच आहे. युध्द सुरू होण्यापूर्वी चांदीचा प्रतिकिलो दर ६३ हजार ते ६४ हजार असा होता. तो आज चक्क सत्तर हजारावर पोचला आहे. सोन्याच्या दरातही (Gold Price) तब्बल दीड हजारांची वाढ युध्द कालावधीत आतापर्यंत झाली आहे. आज सोन्याचा दर ५३ हजार प्रतितोळा (दहा ग्रॅम) आहे.

दरवाढीने दागिन्‍यांची मोड

सोन्यातील गुंतवणूकदार मात्र सोने, चांदीच्या (Silver) दरामुळे चक्रावले आहेत. अनेकांनी सोने, चांदी घेणे थांबविले आहे. तर काहींनी दरवाढीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी सोने, चांदीचे दागिने विकण्यास काढले आहेत, असे चित्र सोने बाजारात आहे.

काही दिवसांतील सोने, चांदीचे दर ‘जीएसटी’ विना असे

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी प्रतिकिलो

१ मार्च--५० हजार ८००--६७ हजार

३ मार्च--५१ हजार ३००--६८ हजार ५००

४ मार्च--५१ हजार ९००--६९ हजार

५ मार्च--५३ हजार ---७० हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT