Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: झोपेत उलटी झाली अन्‌ श्वासनलिकेत अडकून बालिकेचा मृत्यू

झोपेत उलटी झाली अन्‌ श्वासनलिकेत अडकून बालिकेचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील रामपेठ भागातील आठ वर्षीय बालिकेला झोपेत उलटी (वांती) झाली. ती उलटी घशात अडकल्याने त्या चिमुकलीचा मृत्यू (Death) झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अनुष्का मुकेश भोई (जावरे) असे मृत मुलीचे नाव आहे. एकुलत्या (Jalgaon) एक मुलीच्या अचानकच्या अशा जाण्याने अनुष्काच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. (Maharashtra News)

जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे यांची आठ वर्षांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत वास्तव्यास आहेत. अनुष्का महापालिकेची शाळा क्रमांक तीनमध्ये सीनिअर केजी या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी अनुष्का सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आली. मात्र घरी आल्यावर अनुष्काला बरं वाटत नव्हते. तिला ताप असावा, म्हणून अनुष्काची आई अलका यांनी तिला झोपविण्याचा प्रयत्न केला.

झोपेत उलटी झाली अन्‌

याचदरम्यान अनुष्काला दोनवेळा उलटी झाली. गुळण्या करून पाणी पिल्यावर अलका यांनी अनुष्काला झोपविले. मात्र, पुन्हा अनुष्काला त्रास होऊ लागला. झोपलेली असतानाच अनुष्काला उलटी झाली. ही उलटी घशात अडकली. त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास झाला व त्यातच ती बेशुद्ध पडली. काही वेळातच अनुष्काची प्रकृती खालावल्याने आई-वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत अनुष्काचा तोपर्यंत मृत्‍यू झाला होता. रुग्णालयात पोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT