Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : विवाहानंतर विदाईच्या वेळेला लग्नमंडपात घडले अघटीत; टाकीत बुडून चिमुरडीचा मृत्यू

Jalgaon News : लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शहरातील उस्मानिया पार्कमध्ये लग्नासाठी आलेल्या बालिकेचा मंडपाजवळील बांधकामाच्या ठिकाणी अंडरग्राउंड सेप्टी टँकमध्ये बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. लग्न मंडपात (Jalgaon) पंगत संपवून नवरीची विदाई होण्यापूर्वीच ही घटना समोर आली. यामुळे आनंद व उत्साहात पार पडलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली होती. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात ९ डिसेंबरला राज्य परिवहन मंडळाचे निवृत्त कर्मचारी मुक्तार सय्यद यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नासाठी नातेवाईक आले होते. यांच्यात निजामपूर (ता. साक्री) येथील परवेझ सय्यद यांची पत्नी तीन मुलांसह शुक्रवारपासून जळगावला आल्या होत्या. उस्मानिया पार्क परिसरात ड्युप्लेक्स स्किम अंतर्गत मागूनपुढून आठ घरांचे बांधकाम सुरू आहे. लग्न मंडपाला लागूनच बांधकाम सुरू असल्याने (Mariage) लग्नासाठी आलेल्या लहान मुलांसह गल्लीतील मुलेही येथे खेळत होती. खेळता-खेळता तस्मिरा परवेझ सय्यद या बालिकेचा पाण्याने भरलेल्या १० ते १२ फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गल्लीतच मंडप टाकण्यात आला होता. मंडपाजवळच चार ड्युप्लेक्स बंगलोचे बांधकाम सुरू असून प्रत्येक घरात स्वतंत्र सेप्टिक टँक बांधले आहे. बांधकामासाठी लागणारे पाणी याच या टाक्यांमधून घेतले जात असल्याने त्या पाण्याने भरलेल्या होत्या. सर्वच लहान मुले बांधकामाच्य ठिकाणी, वाळूवर खेळत असल्याचे सय्यद यांच्या लक्षात आले. स्लॅबचे काम सुरू असल्याने त्यांनी लहानग्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना भरलेला सेप्टीटँक दिसला. त्यांनी एकेक करून चारही घरातील टँक पाट्यांनी झाकण्यास सुरवात केली. चौथ्या टँकमध्ये मुलीचा फ्रॉक दिसल्याने कुणाची बाहुली टाकीत पडली म्हणून डोकावले असता त्यात मृत बालिका आढळली. पाण्याच्या टाकीत बालिका पडल्याचे कळताच लग्नमंडपात महिलांनी एकच आक्रोश केला. 

आई पडली बेशुद्ध

बालिकेचे वडील परवेझ सय्यद साक्री तालुक्यात रिक्षा चालवून गुजराण करतात. जवळचे लग्न असल्याने पत्नी तिन्ही चिमुरड्यांसह कुटुंबातील इतर लोक जळगावला आले होते. मात्र, ते आले नव्हते. तस्मिराचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलीची आई बेशुद्ध पडली. आईच्या अक्रोशने मंडपात आणि संपूर्ण गल्लीत महिलांना हुंदके अनावर झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Horoscope Today : काहींना लक्ष्मी प्राप्तीसाठी सुसंधी मिळतील, तर कोणाला होईल आजाराचे निदान, तुमची रास काय?

Raosaheb Danve: खरंच नेते म्हणायचं का? फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ

Daily Horoscope: आजचा शुभ दिवस देणार बरंच काही; वाचा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT