leopard  saam tv
महाराष्ट्र

तोंडापूर परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार; दिवसा अनेकांना दर्शन

तोंडापूर परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार; दिवसा अनेकांना दर्शन

साम टिव्ही ब्युरो

तोंडापूर (जळगाव) : तोंडापूर परिसरातील अजिंठा लेणी डोंगररांगामधील वन्यप्राणी बिबट्याचा मुक्‍तसंचार गावाच्या जवळ होत असल्याने व पाळीव प्राणी जंगलातील प्राण्यावर हल्ला चढवत आहे. यामुळे शेतकरी (Farmer) वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (jalgaon news Free movement of leopard in Tondapur)

जंगलातील होणाऱ्या अमर्याद वृक्षांची तोंडमुळे जंगल भकास होत असल्याने अन्न पाण्याच्या शोधात वन्यप्राणीचा वावर मानवी वस्त्याकडे वळला आहे. तोंडापूर परिसराला लागून अजिंठा लेणी (Ajintha Cave) डोंगररांग असल्याने या भागात वन्यप्राणींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. डोंगर भागातील नद्यानाल्यातील पाण्याचे साठे आटल्याने पाणी व अन्नाच्या शोधात प्राणी भटकंती करत गावाच्या आसपास असलेल्या शेतातील प्राण्यांची शिकार करत आहे.

कपाशीच्‍या शेतात बिबट्याचा आवाज

गेल्या दोन दिवसांपासून जामनेर ते तोंडापूर गावाच्या जवळ रस्त्यावर दोन बिबट्यांचे (leopard) दर्शन दिवसा जाणाऱ्या येणाऱ्यांना होत आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या महिला व शेतकरी वर्ग दिवसा शेतात जाण्यास घाबरत आहेत. जामनेर (Jamner) रस्त्यावर कपाशीच्या शेतातील बिबट्याचा आवाज महिलांच्या कानावर आल्याने काम सोडून घरी परत आल्याच्या घटना घडत आहे. जामनेर रस्त्यावर एका चारचाकी वाहनातून रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या बिबट्याचे मोबाईल मध्ये फोटो घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT