Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Fraud Case: नोकरीच्या आमिषाने फसवणूक; १५ लाख गंडविले

Jalgaon Fraud : नोकरीच्या आमिषाने फसवणूक; १५ लाख गंडविले

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : येथील तलाठी कॉलनीतील रहिवासी व शेती काम करणाऱ्या प्रवीण हरी शिंदे या युवकाकडून लष्करात (Fraud) नोकरी लावून देण्याच्या आमिषाने १५ लाख १६ हजार रुपये लाटल्याप्रकरणी नाशिक (Nashik) येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

प्रवीण शिंदे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. लष्करात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत नाशिक येथील रामकृष्ण शंकर राऊत यांनी प्रवीण शिंदे व त्‍यांच्‍या भावाकडून २० ऑगस्ट २०१९ ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान १५ लाख १६ हजार रुपये लाटले. ही रक्कम (Jalgaon News) रामकृष्ण राऊत यांच्या बँक खात्यात वेळोवेळी जमा केली. परंतु तीन वर्षे झाले तरी नोकरी नाही व पैसेही परत नाही.

त्यामुळे संशय आल्‍याने पैशांची मागणी केली. राऊत याने उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पाचोरा पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : विमान अपघातानंतर अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली?

अजित पवारांचा अपघात कसा झाला? घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल, ब्लॅक बॉक्स सापडला|VIDEO

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच शाळेतील मुलही भावुक

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक मैदानात नागरिकांची मोठी गर्दी

विमान तिरकं होताच विपरीत घडलं; अजित पवारांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर, VIDEO

SCROLL FOR NEXT