fraud marriage saam tv
महाराष्ट्र

पैशासाठी केले तरुणासोबत लग्न; उकळले ८५ हजार

पैशासाठी केले तरुणासोबत लग्न; उकळले ८५ हजार

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : तालुक्‍यातील किनगाव येथील तरुणाकडून पैसे उकळत लग्न करून फसवणूक करणाऱ्या फरार असलेल्या नववधूला यावल पोलिसांनी अटक केली आहे. संशयित नववधूला येथील न्यायालयात हजर केले असता न्या. एस. एम. बनचरे यांनी मंगळवारपर्यंत (ता. ८) पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे. (jalgaon news fraud Married a young man for money)

किनगाव येथील धनंजय हिरालाल सोनार या तरुणाचा यशवंत उर्फ दादू विजय पाटील (रा. सांगवी खुर्द, ता. यावल) (Yawal) यांची मानलेली बहीण सरिता प्रकाश कोळी (रा. अंजाळे, ता. यावल) हिच्यासोबत विवाह निश्चित झाला होता. या विवाहासाठी (Marriage) सव्वा लाख रुपये द्यावे, तसेच लग्नाचा खर्च मुलाने करावा, असे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे ८५ हजार रुपयांची रोकड देण्यात आली होती. उर्वरित रक्कम नंतर देणार होते.१४ डिसेंबरला देहू आळंदी (जि. पुणे) येथे मंगल कार्यालयात लग्न देखील पार पडले.

आईच्‍या भेटीसाठी गेली ती आलीच नाही

लग्नाच्या सात दिवसानंतर यशवंत उर्फ दादू विजय पाटील किनगाव येथे आला व नववधू सरिता कोळी हिला तिच्या आईच्या भेटीसाठी मी घेऊन जात आहे, असे सांगून घेऊन गेला तर परत आलाच नाही. सर्वत्र शोधाशोध करून देखील नववधू आणि तिचा मानलेला भाऊ मिळून न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सोनार यांच्या लक्षात आले. सोनार यांनी यावल पोलिस (Yawal Police) ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित नववधू सरिता हिला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित नववधू सरिता हिस न्यायालयात प्रथम वर्ग न्यायमूर्ती एन. एच. बनचरे यांच्यासमोर हजर केले असता तिला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Government Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची संधी; २९० पदांसाठी भरती; पगार मिळणार १,७७,५००; आजच करा अर्ज

Liver Infection: शरीराच्या या भागात वेदना होत असेल तर समजा लिव्हर खराब झालंय; इन्फेक्शनचे असतात हे संकेत

Homemade Idli Recipe: घरीच बनवा साऊथ इंडियन स्टाईल इडली, लगेच करा नोट करी ही रेसिपी

Bhau Kadam: 'वडील फक्त रडत होते…', भाऊ कदम यांनी सांगितला ‘तो’ खास भावनिक प्रसंग, म्हणाले- 'आज इतकं नाव कमावलं पण...'

SCROLL FOR NEXT