अमळनेर (जळगाव) : दौलताबाद येथील एका तरुणाला फसवून दागिन्यासह पळून आलेल्या जळगावच्या एका तरुणीने अमळनेर तालुक्यातील एका मुलाला देखील विवाह (Marriage) करून दोन लाखात फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. (jalgaon news fraud marriage case open social media video)
जळगाव (Jalgaon) येथील एका तरुणीचा तालुक्यातील एका तरुणाशी ६ एप्रीलला विवाह झाला. त्याच वेळी मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेने दोन लाख रुपयांची मागणी करून ते घेतले. इकडे तरुणाने विवाह होत नसल्याने गावात आणि आपल्या मित्रांना देखील मुलगी पैसे देऊन आणत असून विवाह करत असल्याचे लपवून ठेवले होते.
व्हीडीओतील तरुणी तिच..
मुलीकडील चारच नातेवाईक आले आणि तेही पैसे मागत असल्याने तरुणांच्या मित्रांना शंका आली. त्यांनी दोन तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरची (Social Media) बातमी पाहिली होती. त्यात एका तरुणीने २६ मार्चला दौलताबाद येथील एका तरुणाशी विवाह करून लग्नानंतर फिरायला गेलेली असताना दागिने घेऊन पळून गेल्याची बातमीचा व्हीडिओ पाहिला होता. त्यातील तरुणी आणि ही तरुणी एकच असल्याचे काही तरुणांनी पाहिले आणि घटना उघडकीस आली. त्यानंतर गावकऱ्यांनी नवरी मुलगी आणि तिचे नातेवाईक यांना थांबवून ठेवले. आपली चोरी उघडकीस आल्याचे समजताच तरुणीने कबुली दिली. मात्र नवरदेवाच्या पालकांनी दिलेले दोन लाख रुपये परत घेतले.
दहा हजार रूपये देवून मुलीचा वापर
अधिक माहिती घेतली असता मुलीच्या नातेवाईक आणि मुलाच्या नातेवाईक महिलांनी फसवल्याचे लक्षात आले. नवरी मुलीला देखील फसवण्यात आले; तिचे फक्त पाच दहा हजारात समाधान केले जाते असे निदर्शनास आले. त्यामुळे नवरदेवकडील लोकांनी समजूतदार पणा दाखवून त्यांना सोडून दिले मात्र सोशल मीडियावरील बातमीमुळे तसेच नवरा मुलाच्या मित्रांमुळे फसवणूक होता होता वाचली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.