Jalgaon News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत कामाला लागला. नवीन कंपनीत हजर होण्याचा पहिलाच दिवस असल्याने वेळेवर (Jalgaon) कामावर हजर झाला. परंतु त्याचा हा कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला. कंपनीत काम करत असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने २२ वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. (Tajya Batmya)

जळगाव एमआयडीसीत असलेल्या कंपनीत ही घटना सोमवारी (१६ ऑक्टोबर) घडली. राहूल दरबार राठोड (वय २२, रा. शेलगाव, ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी (वय २०, रा. बेटावद ता. जामनेर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहूल राठोड हा गेल्या २० वर्षांपासून आई-वडील व लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमानगरात वास्तव्याला होता. 

कंपनी बदलली 

गेल्या काही वर्षांपासून मत राहूल राठोड हा एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींग करण्याचे काम करत होता. नंतर ते काम सोडून सोमवारपासून त्याने प्लास्टीक कंपनीत कामाला सुरूवात केली होती. त्यानुसार सोमवारी १६ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता कामावर हजर झाला. यावेळी कंपनीत काम करत असताना मशीनमुळे विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला जीवन चौधरी हा गंभीररित्या भाजला गेला आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी राहुल यास मृत घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

SCROLL FOR NEXT