Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: हृदयद्रावक..दहा दिवसांवर मुलाचे लग्‍न; पत्रिका वाटपाच्‍या लगबगीत होत्‍याचे नव्‍हते झाले, अख्‍खे घर दुःखाच्‍या खाईत

हृदयद्रावक..दहा दिवसांवर मुलाचे लग्‍न; पत्रिका वाटपाच्‍या लगबगीत होत्‍याचे नव्‍हते झाले, अख्‍खे घर दुःखाच्‍या खाईत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मुलाचे लग्‍न असल्‍याने घरात सर्व तयारी झालेली होती. दहा दिवसांवर विवाह (Marriage) सोहळा असल्‍याने पत्रिका वाटपाची देखील लगबग (Jalgaon News) अंतिम टप्‍प्‍यात होती. अशात होत्‍याचे नव्‍हते झाले अन्‌ अख्‍खे घर दुःखाच्‍या खाईत लोटले गेले. (Tajya Batmya)

जळगाव शहरातील जीवननगरात वास्‍तव्‍यास असलेले तथा ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय ५७) यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे १ जूनला लग्न नियोजित होते. यामुळे ते मंगळवारी (२३ मे) सकाळी पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडले. चोपडा, अमळनेर, धरणगावमार्गे ते एरंडोल येथील ग. स. सोसायटीच्या कार्यालयात पत्रिका वाटण्यास तीन वाजेच्या सुमारास गेले होते. पत्रिकांवर नाव लिहिण्यासाठी खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जवळच्याच रुग्णालयात (Hospital) कर्मचाऱ्यांनी नेले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जळगाव येथे नेण्यास सांगितले. जळगाव शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

कुटुबियांचा आक्रोश

महेंद्र मोरे यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मोठा मुलगा विक्रांत, लहान मुलगा कुणाल असा परिवार आहे. विक्रांत पुण्यात कंपनीत तर लहान मुलगा एमबीएचे शिक्षण घेत आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahi Tukda Recipe: संध्याकाळी काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा हॉटेल स्टाईल शाही तुकडा

Maharashtra Live News Update: ⁠- नाशिक पोलिस मुंबईच्या वेशीवर दाखल

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

SCROLL FOR NEXT