Farmer Saam tv
महाराष्ट्र

शेती करत त्‍यांनी वाचले अडीच हजार पुस्‍तके अन्‌ तयार केली लायब्ररी

शेती करत त्‍यांनी वाचले अडीच हजार पुस्‍तके अन्‌ तयार केली लायब्ररी

संजय महाजन

जळगाव : लोहारा येथील शेतकरी विश्वासराव पाटील यांना वाचनाची आवड. या आवडीच्‍या छंदातून विश्वासराव पाटील यांनी मागील ६५ वर्षात शेती सांभाळत अडीच हजार पुस्तकांचे वाचन केले. एवढेच नव्हे, तर विविध साहित्यिकांनी लिहिलेल्या तीन हजार पुस्तकांचा (Book) संग्रह करत त्‍याची लायब्ररी केली आहे. (jalgaon news farming he read two and a half thousand books and created a library)

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) तालुक्यातील लोहारा गावातील कृषीभूषण शेतकरी विश्वासराव पाटील यांच्याकडे वडिलोपार्जीत पन्नास एकर शेती आहे. ही शेती करीत असतानाच विश्वासराव पाटील यांचा शालेय जीवनापासूनच कवीवर्य ना. धों. महानोर आणि भवरलाल जैन यांच्याशी संपर्क आला. कवी महानोर आणि भवरलाल जैन यांची वाचनाची आवड पाहता त्यांच्या संपर्कातून विश्वासराव यांनाही वाचनाची आवड लागली. याच वाचनाच्या छंदापोटी त्‍यांनी राज्यातील सर्वच नामांकित साहित्यिकांसह विविध संतांची लिखाण वाचन केली आहे. आज ८० वर्षाच्या उंबरठ्यावर असतानाही विश्वास पाटील यांची वाचनाची गोडी कमी झालेली नसून उलट त्यात वाढच झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

पुस्‍तकातील ज्ञान शेतीत उतरविले

शेती करीत असताना शेती विषयी पुस्तक वाचन केल्याचा फायदा आपल्याला शेतीत झाला असून पुस्तकातून मिळालेले ज्ञान शेतीसाठी वापरले. यामुळेच (Farmer) कृषीभूषणसह विविध सन्मान मिळविले आहेत. याचे संपूर्ण श्रेय आपल्या वाचनाला जात असल्याचे विश्वास पाटील यांनी म्हटले आहे. तीस वर्षापूर्वी ‘पाषाणातून पाझर’ हे पुस्तक वाचनात आले. तर महानोर यांचे ‘शेती आणि पाणी’ हे पुस्तक वाचनात आले. आणि शेतीसह आपले संपूर्ण जीवनच यामुळे बदलून गेले. आपण ज्ञानाने, मनाने, विचाराने श्रीमंत आणि समृध्द झालो असल्याचं आपल्याला वाटू लागले असल्याचं ही विश्वासराव पाटील मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात

अन्‌ पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार

पुस्तके वाचन करीत असताना त्यांचं केवळ वाचनच केले असे नाही तर त्यातील आशय आत्मसात करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. पाषाणातून पाझर हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या परिसरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन गावालगत असलेल्या नाल्यावर अनेक बंधारे घालून गावात पाणी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग करू शकलो. वाचनातून ही कल्पना आणि समृद्धी मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT