फळांच्या राजाचा हा राजेशाही भाव; दरात 200 ते 300 रुपयांनी वाढ

फळांच्या राजाचा हा राजेशाही भाव; दरात 200 ते 300 रुपयांनी वाढ
Mango
MangoSaam tv
Published On

तबरेज शेख

नाशिक : उन्हाळ्याची चाहूल लागताच नाशिककरांना देखील आंबे खरेदीची ओढ लागते. फळांचा राजा म्हणून ओळख असलेला हापूस आंबा नाशिकमध्ये देखील दाखल झाला आहे. ज्यात देवगड आणि रत्नागीरी (Ratnagiri) आंबे नाशकात दाखल झाले आहेत. चवीने अत्यंत गोड असलेल्या आंब्याचा (Mango) गोडवा यंदा मात्र कमी असणार आहे. (nashik Hapus mango of Konkan got the price this year)

पावसाचा फटका बसल्याने या आंब्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देवगड आणि रत्नागिरी हापुस हा 1200 ते 1500 रूपये डझन इतक्या भावाने आजमितीस विकला जात आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 200 ते 300 रुपये जास्त इतका दर आहे. त्यामुळे सर्वसामान्य (Nashik) नाशिककरांनी आंबे खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्‍यातरी नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या नाशिककरांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आंब्यांचा गोडवा यंदा मात्र कमीच असणार असे म्हटल तर चुकीचे ठरणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com