Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : शेतकऱ्यांचा उद्रेक; एमआयडीसीसाठी जमीन संपादनाला विरोध, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव

Jalgaon News : सरकारने आमच्या जमिनी घेतल्या तर आमच्या मुलांना खायचं काय? आमच्या पिढीजात जमिनी हिरावून घेतल्यास आम्ही उद्ध्वस्त होऊ. उद्योगासाठी जमीन द्या, पण आमच्या पोटाची जमीन नाही.

संजय महाजन

जळगाव : जळगाव एमआयडीसीचा विस्तार केला जात असल्याने यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र या भूसंपादनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. याच विरोधात आज जळगावच्या चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी आज औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांचा रस्ता अडवून जोरदार निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले आहे. 

जळगाव एमआयडीसीसाठी चिंचोली परिसरातील तब्बल २६८ हेक्टर शेती जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. जमीन संपादित केली जाणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. यावेळी जमिनी मोजण्यासाठी आलेल्या महसूल आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांनी घेराव घालत कामाला विरोध केला. आमची शेती आमचं आयुष्य आहे, जमिनीशिवाय आम्ही जगायचं कसं? अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

शेतकऱ्यांच्या संतप्त भावना 

सरकारने आमच्या जमिनी घेतल्या तर आमच्या मुलांना खायचं काय? आमच्या पिढीजात जमिनी हिरावून घेतल्यास आम्ही उद्ध्वस्त होऊ. उद्योगासाठी जमीन द्या, पण आमच्या पोटाची जमीन नाही. असा आक्रोश यावेळी शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, प्रशासनाकडून जमिनीचे मोजमाप करण्याचा प्रयत्न झाला असला तरी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ते काम थांबवण्यात आले आहे.

महामार्गावर ठिय्या आंदोलन 
एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन संपादनाला विरोध दर्शवित शेतकऱ्यांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी केली. यामुळे परिस्थिती ताणतणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT