Crime News : किरकोळ वाद जीवावर बेतला; सिमकार्ड चोरल्याचा संशय, सोबत राहणाऱ्या तरुणाकडून वृद्धाची हत्या

Mumbai News : पोलिसांनी या प्रकरणात मृताच्या रूममेट संजय यादव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

संजय गडदे
मुंबई
: एकाच रूममध्ये एक तरुण आणि वृद्ध सोबत राहत होते. मात्र सिम कार्ड चोरल्याचा संशय घेत रूम सोडण्यास सांगितल्याचा कारणातून दोघांमध्ये वाद झाला. या कारणावरून संतापलेल्या तरुणाने ६४ वर्षीय वृद्धाचा गळा आवडून खून केल्याची धक्कादायक घटना वांद्रे पश्चिम परिसरात घडली आहे. या घटनेने खडबड उडाली असून मारेकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

वांद्रे पश्चिम येथील मेहबूब स्टुडिओज जवळील सार्वजनिक शौचालयात केअरटेकर म्हणून काम करत असलेले शिवजी बनारसिंग (वय ६४) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती शिवजी बनारसिंग आणि त्याचा रूममेट असलेला संजय यादव (वय २८) हे दोघेही मेहबूब स्टुडिओजजवळील सार्वजनिक शौचालयाच्या वरच्या मजल्यावर एकत्र राहत होते. दरम्यान ९ ऑक्टोबरला दुपारी शिवजी यांनी सिम कार्ड हरवल्याने यादव याच्यावर संशय घेतला. या कारणावरून त्याला खोली सोडण्यास सांगितले. 

Crime News
Jalgaon : हद्दच झाली! दागिन्यांसाठी स्मशानभूमीतून अस्थी चोरी; जळगावात आठवडाभरातील दुसऱ्या घटनेने खळबळ

हत्या केल्यानंतर मारेकरी रुममध्येच थांबून 

याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला आणि क्षणातच तो रागाच्या भरात हिंसक वळणावर गेला. यामध्ये आरोपी संजय यादव याने शिवजींचा गळा दाबून जीवे ठार मारले. तर घटनेनंतर यादव शांतपणे तिथेच थांबला होता. संध्याकाळी शौचालय व्यवस्थापकाने शिवजींना बेशुद्ध अवस्थेत पाहून पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता यादव तिथे उपस्थित होता. शिवजींना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Crime News
Badlapur Political News : बदलापुरात महायुतीत फूट; भाजप- राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेना धक्का

मारेकरीस पोलीस कोठडी 
दरम्यान पोलिसांनी प्राथमिक तपासात मानेवरील खुणा आणि कानातून रक्तस्राव आढळल्याने हत्या झाल्याचा संशय बळावला. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर घटनेच्या वेळी खोलीत फक्त यादव आणि शिवजी असल्याचे स्पष्ट झाले. अखेर चौकशीत यादवने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. वांद्रे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, न्यायालयाने आरोपीला १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com