engineering student
engineering student 
महाराष्ट्र

इंजिनिअरींग करणारी भावंडे- शेतात अभ्यास करुन करताहेत आई वडिलांनाही मदत

Rajesh Sonwane

राजेश सोनवणे/ संजय महाजन

जळगाव : यंदा लांबलेला पाऊस..यामुळे उद्‌भवलेली दुबार पेरणीचे संकट. शिवाय कोरोना महामारीमुळे सारे लॉकडाउन व त्‍यात वाढलेल्‍या महागाईने जगणेच बदलवून टाकले आहे. यात शेतकरी म्‍हटला तर उत्‍पन्‍न कमी व खर्च जास्‍त अशी स्‍थीती आहे. दुबार पेरणी करताना वाढलेल्‍या मजुरीने परवडेल कसे? हा प्रश्‍न आहे. मात्र यावर शेतकरीची मुले इंजिनिअरींग करत असताना ऑनलाईन क्‍लास शेतातच अटेंड करतात त्‍यानंतर शेतीच्‍या कामात राबत आहेत. (jalgaon-news-farmer-child-engineering-student-onine-study-farm-and-work)

सबगव्‍हाण (ता.अमळनेर) या परिसरातील हे चित्र आहे. आकाश व संजिवनी शिंदे असे या दोन्‍ही भावंडाचे नाव आहे. शिंदे कुटुंब गावात राहून शेती करतात. आकाश व संजिवनी यांना इंजिनिअरींगच्‍या शिक्षणापर्यंत पोहचविले. परंतु, कोरोना महामारीमुळे महाविद्यालय अजून देखील सुरू झालेले नाही. यामुळे ऑनलाईन क्‍लास सुरू झाले आहेत. स्‍मार्ट फोनवर दोन्‍ही भावंडे क्‍लास अटेंड करतात. तर दुसरीकडे शेतीचे कामे देखील सुरू आहेत.

engineering-student

मजुरी महागली अन्‌ मजुरही मिळेना

शेतकरीला शेती करणे देखील आता परवडेना. एक तर महागाई वाढल्‍यामुळे शेतमजुरांची मजुरी देखील वाढली आहे. इतकेच नाही तर गरजेच्‍यावेळी मजुर देखील मिळत नसल्‍याचे चित्र ग्रामीण भागात निर्माण झालेले आहे. यामुळे अनेकदा जास्‍तीचे पैसे देवून मजुर आणावे लागत असतात.

शेतात क्‍लास करून लावतात हातभाव

शिंदे कुटुंबातील आकाश व संजिवनी हे दोन्‍हीजण इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. ऑनलाईन क्‍लासमुळे सकाळी आई– वडीलांसोबत शेतात गेल्‍यावर प्रथम क्‍लास अटेंड करतात. शेती कामासाठी मजूर न मिळाल्यामुळे इंजिनिअरिंग शिकणारी मुले आई- बाबांसोबत शेतीला हातभार लावत आहे. आकाश व संजिवनी शिंदे हे दोन्ही भावंडे मका लागवड करून शेतातच ऑनलाईन अभ्यास करून शेतीकामासाठी मदत करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulabrao Patil : आमच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या सभांचा फरक पडणार नाही; मंत्री गुलाबराव पाटील

Amravati : अवैध रेती उपसा प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल, चाैघे अटकते; 1 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल जप्त

ICSE Result News | ICSE दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

Hemant Soren: वाढलेली दाढी, गळ्यात मफलर; अटकेनंतर हेमंत सोरेन पहिल्यांदाच तुरूंगाबाहेर, नवा फोटो पाहिलात का?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाला दाखवा आमरस पोळीचा नैवेद्य, पाहा रेसिपी

SCROLL FOR NEXT