Gold Silver Price Saam tv
महाराष्ट्र

Gold Silver Price: चांदीच्या दरात हजाराची घसरण; सोन्यातही घट

चांदीच्या दरात हजाराची घसरण; सोन्यातही घट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दिवाळीच्या सणानंतर सोने-चांदीच्या दरात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. येथील सराफ बाजारात (Silver) चांदीच्या दरात तब्बल हजार रुपयांची घसरण झाली. ३ नोव्‍हेंबरला चांदीचा भाव जीएसटीसह प्रतिकिलो ६० हजार रुपये होता. हीच चांदी २ नोव्‍हेंबरला ६१ हजारांच्या घरात पोचली होती. दुसरीकडे (Gold Price Today) सोन्यात चारशे रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Letest Marathi News)

आंतरराष्ट्रीय भावातील चढ-उतारामुळे दरात अस्थिरता दिसून येत असल्याचे जाणकारांचे मत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने ५२ हजार ८०० प्रतितोळा होते. आज तेच सोने ५० हजार २०० प्रतितोळा झाले आहे. आठवडाभरात मोठ्या प्रमाणावर (Gold And Silver) सोन्या- चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून येत आहे.

दरात चढउतार सुरूच

गणेशोत्सवानंतर सोने बाजार झळाळू लागला. कमी-अधिक प्रमाणात दरात वाढ, घट होत होती. चांदी ५४ हजारांपर्यंत खाली आली होती. सोने पन्नास हजारांपर्यंत खाली आले होते. मात्र नवरात्रोत्सवात सोने बाजाराने जी घसरण घेतली ती विजयादशमीपर्यंत व नंतरचे काही दिवस कायम होती. आत तब्बल दहा दिवसांनी सोने ५० हजार २०० रुपये प्रतितोळा आहे. चांदी ६० हजारांवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धावत्या रेल्वेत महिलेने शिजवल्या नूडल्स; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासन भडकले|VIDEO

ChatGPT वर आता ग्रुप चॅट करता येणार; Open AI चा नवा फंडा; कसं वापरायचं?

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या, पडदे फडले पाहा धक्कादायक VIDEO

Pune Crime : नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध, भावानेच भावाची केली हत्या

SCROLL FOR NEXT