Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पती कामावर गेल्यानंतर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : महिलेने आवाज देत घरात डोकावून बघितले. यानंतर मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हा प्रकार पाहून एकच आराडाओरड करत त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना (Jalgaon) घडली. घराचे दार उघडे असल्याने शेजारील महिलेने डोकावून बघितल्यावर घडला प्रकार पाहून महिला घाबरली. यानंतर तिने ही बाब परिसरात सांगितली. तालुका पोलिसांत (Police) आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. (Breaking Marathi News)

आव्हाणे (ता. जळगाव) येथील मनिषा लहू मोरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. लहू मोरे मोलमजुरी करून पत्नी मनीषा व तीन वर्षीय मुलीसह वास्तव्यास होते. दरम्यान ५ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे लहू मोरे सकाळी कामावर गेले. यानंतर मनिषा या घरात एकत्याच होत्या. घरात कोणीही नसल्याने मनीषाने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घराचा दरवाजा उघडाच असूनही मनिषा बराच वेळ झाले बाहेर आली नाही. म्हणून दुपारी साडेबाराच्या सुमारास शेजारील महिलेने आवाज देत घरात डोकावून बघितले. यानंतर मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हा प्रकार पाहून एकच आराडाओरड करत त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. तत्काळ घटनेची माहिती पती लहू मोरे यांना कळवली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : बोटीतून करा इतिहासाची सफर, १६व्या शतकातील 'हा' किल्ला पाहा

Today Gold Rate : सोनं प्रति तोळा ₹९८०० नी झालं स्वस्त, तर चांदीत ५३ हजारांची घट; वाचा सुवर्णनगरीतील 22k, 24k चे दर

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक; महापौर पदावर कोणाची वर्णी? सस्पेन्स कायम

Home Remedies For Teeth: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? हे 5 घरगुती उपाय करा, दात मोत्यासारखे चमकतील

Arijit Singh : "मला माहित आहे..."; अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंग का सोडले? प्रसिद्ध गायकाने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT