suicide 
महाराष्ट्र

सुसाइड नोट लिहून व्‍हायरल करत संपविली जीवनयात्रा

सुसाइड नोट लिहून व्‍हायरल करत संपविली जीवनयात्रा

साम टिव्ही ब्युरो

एरंडोल (जळगाव) : येथील ४९ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. २६) पहाटे घडली. संतोष लक्ष्मण महाजन (रा. हनुमाननगर, म्हसावद रोड, एरंडोल) असे मृताचे नाव आहे. (jalgaon-news-erandol-man-Life-ended-by-writing-a-suicide-note-and-going-viral)

संतोष महाजन यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळील निसार मुजावर यांच्या शेतालगत असलेल्या पडिक शेतात निंबाच्या झाडास दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी (ता.२६) सकाळी उघडकीस आली. त्यास खाली उतरवून खासगी वाहनाने एरंडोल (Erandol) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत संतोष महाजन रोलरचालक होते. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, जावई असा परिवार आहे.

सुसाइड नोट लिहिली अन्‌

अंगावरील जॅकेटच्या खिशात सुसाइड नोट (Suicide Note) आढळून आली असून, ती पोलिसांनी (Police) जप्त केली आहे. त्यात चार जणांच्या नावांचा उल्लेख असून, ही चिठ्ठी तपासकामी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संतोष महाजन यांनी सुसाइड नोटचे फोटो मुले व नातेवाइकांना वायरल केली होती. शहरातील अनेक लोकांच्या मोबाईलवर ही सुसाइड नोट वायरल झाली होती.

मृत संतोष महाजन यांची मुले व नातेवाइकांनी चिठ्ठीमध्ये असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. पोलिस प्रशासनातर्फे मृताच्या नातेवाइकांची समजूत घालून आधी मृतावर अंत्यसंस्कार करा व पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल करा, असे सांगितले. याबाबत एरंडोल पोलिस ठाण्यात किरण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस कर्मचारी अनिल पाटील, संतोष चौधरी तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुलं घरात राहून कंटाळी? मग वीकेंडला मुंबईतील 'या' ठिकाणी करा पिकनिक प्लान

मुंबईसह महाराष्ट्राच्या निवडणुकीचा साम टीव्हीचा एक्झिट पोल ठरला तंतोतंत खरा

Maharashtra Elections Result Live Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज्य येणार-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

SCROLL FOR NEXT