Jalgaon News Mahavitaran Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: २४९ डिजिटल शाळांमध्‍ये अंधार; बिल थकल्‍याने वीज कनेक्शन कट

२४९ डिटीटल शाळांमध्‍ये अंधार; बिल थकल्‍याने वीज कनेक्शन कट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्हा परिषदेचा डिजीटल शाळांवर भर आहे. परंतु, वीज बिल थकित ठेवल्‍याने जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील २४९ शाळांचे वीज कनेक्शन महावितरणकडून (Mahavitaran) कट करण्यात आले आहे. त्यामुळे डिजीटल शाळांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (Letest Marathi News)

जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या डिजीटल शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे; हा दृष्टीकोन समोर ठेवून शिक्षण विभागाचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला प्राप्‍त होत असलेल्‍या निधीतून सुविधा करायच्‍या आहेत. अर्थात वित्त आयोगातून गावातील शाळांचे वीज बिल अदा करावे, असा ठराव करण्यात आला होता. परंतु, याची अंमलबजावणी होत नसल्‍याने शाळांचे वीज बिल थकित राहत आहे.

अखेर कनेक्‍शन कापले

शाळांकडे वीज बिल थकित असल्‍याने महावितरणकडून बिल भरण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. मात्र बिल भरणा न झाल्‍याने महावितरणकडून जिल्ह्यातील २४९ शाळांचा वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. त्यात रावेर तालुक्यात सर्वाधिक ३९ शाळांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

SCROLL FOR NEXT