Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

बैलगाडीवर अचानक तुटून पडली विद्युत तार; शेतकऱ्यासह एका बैलाचा मृत्‍यू

बैलगाडीवर अचानक तुटून पडली विद्युत तार; शेतकऱ्यासह एका बैलाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : बैलगाडीने शेतात जात असलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीवर वीज खांबावरील विद्यूत तार तुटून पडली. यात शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार (Death) झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चिखली बुद्रुक (ता. यावल) शिवारात घटली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Jalgaon News Farmer Death)

यशवंत कामा महाजन (वय ६२) (रा.चिखली बुद्रुक ता.यावल) असे मृत शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. यशवंत महाजन हे चिखली येथे आपल्या परिवारासह राहत होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे ते आज (१ सप्‍टेंबर) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बैलगाडीने (Bullock Cart) चिंखली बुद्रुक शिवारातील शेतात रस्त्याने जात होते.

अचानक तार तुटली

याचवेळी अचानक विद्युत खांब्यावरील तार तुडून बैलगाडीवर पडली. यात वीजेच्या तीव्र झटक्याने यशवंत महाजन आणि एक बैल जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व वायरमन यांनी धाव घेतली. सुरूवातीला विद्युत प्रवाह बंद करण्यात येवून त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glass bottle incident: तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली काचेची बाटली, त्रास होऊ लागल्याने तरूण पोहोचला रूग्णालयात अन्..!

Gadchiroli: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडलं, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: शहादा तालुक्यातील शिरुड गावात हातभट्टीवर पोलिसांचा छापा

Hair Care: उन्हाळा सुरु झाल्यावर केसात अचानक कोंढा वाढलाय? मग आठवडाभर वापरा 'हे' तेल

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा; रविवारी प्रवाशांचे मेगा हाल होणार, कसं असेल वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT