Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

माझे राजकारण संपविण्यासाठी सगळे एकत्र आले तरी ते कधीही सफल होणार नाही; खडसेंचा टोला

माझे राजकारण संपविण्यासाठी सगळे एकत्र आले तरी ते कधीही सफल होणार नाही; खडसेंचा टोला
Published on

जळगाव : चाळीस वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. या कालखंडात विरोधकांना विरोध करण्यासाठी एकटा नाथाभाऊ समर्थ ठरला आहे. शून्यातून विश्व निर्माण करत राजकारणात यशस्वी वाटचाल केली. त्यामुळे (Jalgaon) विरोधकांनी माझे राजकारण कितीही संपवण्याचा प्रयत्न केला; तरी जनतेच्‍या आशीर्वादाने माझे राजकारण संपविण्यासाठी सगळे एकत्र आले तरी त्यांचे प्रयत्न कधीही सफल होणार नाही; असा टोला (NCP) राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांना दिला आहे. (Jalgaon Eknath Khadse News)

Eknath Khadse
चांगली बातमी..बाप्पाची भक्ती अन्‌ तुटल्‍या धर्माच्या भिंती, मुस्लिम मुलाने दिलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा 2 सप्टेंबरला वाढदिवस आहे. या पाश्‍र्वभुमीवर जळगाव येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. त्‍यांनी बोलताना राज्‍य सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

खडसेंचा शिंदे सरकारवर निशाणा

गणेशोत्सव सुरू असून बाप्पा बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे या बुद्धीच्या देवतेला विनंती करतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बुद्धी दे आणि मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार कर. तर सरकारबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येण बाकी आहे. या निकालामुळे शिंदे सरकारमध्ये साशंकता असावी; त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबवल्‍याचा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.

नुसत्याच घोषणा नको

राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीच संकट कोसळले आहे या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त कर; अशी प्रार्थना त्‍यांनी केली. तर सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे ती मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने लवकरात लवकर मदत करावी; अशी विनंती सरकारला करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com