जळगाव : शहरातील तांबापुरामधील गवळीवाड्यातील हनुमान मंदिराजवळ वायरीचा शॉक लागून ५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ७) रात्री घडली़. तुषार ऊर्फ आरू शिवाजी सुरवाडकर (रा़. गवळीवाडा, तांबापुरा) असे मयत बालकाचे नाव आहे़. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला़. याप्रकरणी पोलिसात (Police) नोंद घेण्यात आली आहे़. (jalgaon news Electric shock while playing Five year old Child dies)
शिवाजी सुरवाडकर पत्नी, मुलगा महेश आणि तुषार अशा कुटुंबासह वास्तव्यास आहेत़. भाजीपाला विक्री करून ते उदरनिर्वाह करतात. गवळीवाडा चौकात घराजवळ हनुमान मंदिर असून या मंदिराच्या (Jalgaon News) प्रांगणातील वाळूवर गुरूवारी सायंकाळी महेश व त्याचा लहान भाऊ तुषार आणि गल्लीतील काही लहान मुले वाळूच्या ढिगाऱ्याजवळ खेळत होती़. मंदिराच्या भिंतीच्या जाळीला तुषारचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार शॉक लागला़ हा प्रकार मोठा भाऊ महेश याला कळताच, त्याने त्याला संरक्षक भिंतीच्या जाळीपासून दूर ओढण्याचा प्रयत्न केला़. मात्र, त्यालाही शॉक लागला़ सुदैवाने किरकोळ दुखापत होऊन त्याचा जीव वाचला. मात्र, लहानभाऊ तुषारचा जागीच मृत्यू (Death) झाला होता़.
आई-वडिलांची धाव
शॉक लागून लहान भाऊ तुषार खाली पडल्याने महेशने धावत जात घरी घटनेची माहिती दिली. आई-वडिलांसह शेजाऱ्यांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. बाळाला बघताच आईने आरूऽऽ अशी आरोळी मारली. तुषार याला उचलून तातडीने जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले मात्र, तपासणीअंती त्याला मृत घोषित केले़. दरम्यान, घटनेनंतर तांबापुरा येथील गवळीवाडा येथे प्रचंड गर्दी झाली होती़. मयत तुषारच्या आई-वडिलांचा आक्रोशाने परिसरात एकच शेाककळा पसरली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.