Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: वरच्‍या खोलीत आजोबांना पाहून नात घाबरून आली खाली; घडल्‍या प्रकाराने कुटूंब हादरले

वरच्‍या खोलीत आजोबांना पाहून नात घाबरून आली खाली; घडल्‍या प्रकाराने कुटूंब हादरले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील हरीविठ्ठील नगर परिसरातील कोठारीनगरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या ६० वर्षीय वृध्दाने घरातील वरच्या मजल्यावर दोरीने (Jalgaon News) गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना २६ फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर (Police) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

पंढरी हरीदास चव्हाण (वय ६०) असे मृत वृध्दाचे नाव आहे. रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहितीनुसार पंढरी चव्हाण हे पत्नी व दोन मुलांसह जळगावातील कोठारीनगरात वास्तव्याला आहेत. आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करून परिवाराचा उदरनिर्वाह करत हेाते. दरम्‍यान रविवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी त्यांनी परिसारसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर आराम करण्यासाठी वरच्या मजल्यावरील खोलीत गेले. तिथे त्यांनी दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली.

नात वरच्‍या खोलीत गेली तेव्‍हा समजले

सायंकाळी सातच्‍या सुमारास पंढरी चव्हाण यांची नात निकिता ही वरच्या खोलीत गेली. यावेळी आजोबा दोरीच्‍या सहाय्याने लटकलेले दिसले. घाबरलेल्‍या अवस्‍थेत निकिती ही खाली आली. घरात तिने सदरचा प्रकार सांगितला. पंढरी चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.ना. रेवानंद साळुंखे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT