Kalyan News: शिवसेनेच्‍या माजी नगरसेवकाकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण; केडीएमसीमधील घटना सीसीटीव्हीत कैद

शिवसेनेच्‍या माजी नगरसेवकाकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण; केडीएमसीमधील घटना सीसीटीव्हीत कैद
Kalyan News
Kalyan NewsSaam tv

अभिजीत देशमुख

कल्‍याण : केडीएमसीच्या उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पातील सुरक्षा रक्षकाना रात्री काही जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणी दरम्यान (Shiv Sena) शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भोईर एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना (CCTV) सीसीटीव्हीत दिसत आहेत. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे त्यातून ही मारहाण झाली असल्याचे बोलले जात आहे. (Live Marathi News)

Kalyan News
Bachchu Kadu: कांद्याचा ट्रक देशाबाहेर घेऊन जाऊ; कांदाप्रश्‍नी राज्य, केंद्र सरकारला आमदार बच्चू कडूंचा इशारा

प्रकल्पाला असलेल्या विरोधातून ही मारहाण झाली की आणखी काय कारण आहे, हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे. याबाबत माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनी घनकचरा प्रकल्पामुळे काल दुर्गंधी पसरली होती. याचा जाब विचारण्यासाठी स्थानिक नागरिक या प्रकल्पाजवळ गेले होते. त्यावेळी नागरिकांचा व ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचा वाद झाला. मी वाद सोडवण्यासाठी गेलो होतो असे सांगितले.

कल्याण (Kalyan) पश्चिमेतील उंबर्डे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या घनकचरा प्रकल्पात काही कंत्रटदार पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमले आहेत. रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक कामावर होते. त्याठिकाणी काही लोक आले. सुरक्षा रक्षक अशोक निकम, सचिन पाटील, ऋतिक अभिषेक हे सर्व सुरक्षा केबीनमध्ये बसले असता एका पांढऱ्या रंगाची कार जबरस्तीने आत आली. त्यामध्ये बसलेल्या तीन इसमांनी काही एक कारण न सांगता बाहेर येऊन सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सचिन पाटील आणि ऋतिक अभिषेक यांना हाताच्या चापटीने मारुन त्यातील एका इसमाने लाकडी दांडक्याने दिनेश शर्मा यांना उजव्या हाताला फटका मारुन जखमी केले. त्यानंतर तीन जण दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी पुन्हा सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

सीसीटीव्‍हीमध्‍ये घटना कैद

पुन्हा इथे दिसू नका. इथे दिसलात तर पुन्हा मार खाणार; असा दम दिला आणि पसार झाले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद आहे. या सीसीटीव्हीत एका ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ माजी नगरसेवक जयवंत भोईर हे सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना दिसून येत आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जयवंत भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्लांटमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून काम व्यवस्थित केले जात नसल्याने गावात दुर्गंधी पसरली होती. याचा जाब विचारण्यासाठी गावातील काही लोक प्लांटमध्ये गेले. यावेळी ठेकेदारांच्या माणसांचा आणि ग्रामस्थांचा वाद झाला होता तो वाद सोडवण्यासाठी मी तिकडे गेलो होतो; असे सांगत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com