Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: पन्नास खोके घेतले, मग मंत्रिपद कशाला?; मुख्यंमंत्र्यांच्या प्रश्‍नाबाबत खडसेंचा गौप्यस्फोट

पन्नास खोके घेतले, मग मंत्रिपद कशाला?; मुख्यंमंत्र्यांच्या प्रश्‍नाबाबत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : ‘पन्नास खोके घेतले, मग तुम्हांला मंत्रिपद कशाला’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावातील मंत्रिपदासाठी लॉबिंग करणाऱ्या आमदारांना विचारतात असा गौप्यस्फोट माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी केला आहे. ते आज भडगाव (Bhadgaon) तालुक्यात कनाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. (Jalgaon Eknath Khadse News)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आजपासून पाचोरा-भडगाव मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली. महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कनाशी गावापासून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, (Amalner) अमळनेरचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, प्रदेश प्रवक्ते योगेश डिसले आदी उपस्‍थीत होते.

गुलाबरावांनाही लगावला टोला

खडसे म्हणाले,‘ मंत्रिपदासाठी जिल्ह्यात रस्सीखेच सुरू आहे. आमदारांनी गाड्या भरून मुंबईत लॉबिंग केले. अपक्ष आमदारांसह अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे तुम्ही पन्नास खोके घेतले ना, मग तुम्हांला मंत्रिपद कशाला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'त्या' आमदारांना विचारतात. जे गुलाबराव आपल्या भाषणातून गद्दारी माझ्या रक्तात नाही, असे सांगायचे तेच गुलाबराव पाटील आता उद्धव ठाकरेंना अक्कल शिकवायला लागले आहेत; असा टोला त्यांनी लगावला. चौफेर टोलेबाजी करत शिंदे गटावर त्यांनी चांगलीच तोफ डागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?

Soft Chapati Tips: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: मनमाड शहरात विजांच्या गड गडाटासह जोरदार पावसाची हजेरी

Sarfaraz Khan: 'खान' आडनावामुळे खेळाडूला डच्चू; सरफराजच्या सिलेक्शनवरून वाद पेटला, औवेसीनंतर काँग्रेस नेत्याचे गौतमवर 'गंभीर' आरोप

Bhau Beej 2025: भाऊबीज करताना आरतीच्या ताटात ठेवा या वस्तू, संपूर्ण लिस्ट वाचा

SCROLL FOR NEXT