Dharmendra Patil 
महाराष्ट्र

कोरोना बाधितांवर उपचारासाठी ‘काश्मीर’ घेतेय जळगावच्या डॉक्‍टराची मदत

कोरोना बाधितांवर उपचारासाठी ‘काश्मीर’ घेतेय जळगावच्या डॉक्‍टराची मदत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जीवन पाहिले तर एक ‘कविता’ आहे, पाहिले तर ’निबंध’ आहे. जो आलेला क्षण आपल्या महत्वांकाक्षेप्रमाणे वापरतो, त्याचबरोबर इतरांच्या सुख, दूःखात सहभागी होती. त्याचक्षणी तो जिवनभर त्या संबंधितांच्या आयुष्याचा एक भाग बनून जातो. मग त्यासाठी त्याला ना देशाच्या सीमा अडवू शकतात ना, परिस्थितीतीचे बांध. (jalgaon-news-doctor-dhrmendra-patil-from-Jalgaon-is-taking-Kashmir-treatment-of-Corona-victims)

जळगावमधील नेत्रतज्ञ डॉ. धमेंद्र पाटील यांनी जम्मू काश्‍मीरच्या सिमेवर जावून कोरोनाकाळात उपचार केले. तेथील नागरिकांसाठी विरोध झुगारून आरोग्य शिबिरे घेतली आहेत. या देशप्रेमाला तेथील आरोग्य यंत्रणा अद्यापही विसरलेली नाही. काश्‍मीरमध्ये कोरेानाचे रुग्ण वाढले असल्याने तेथील आरेाग्य यंत्रणा डॉ.पाटील यांना रोज फोन, मोबाईल द्वारे संपर्क साधून म्युकरमायकोसिस. विषयी उपचाराबाबत माहिती जाणून घेत आहे. ती उपचारपध्दती तेथे लागू करून अनेकांचे प्राण वाचवित आहे.

जम्‍मू– काश्‍मिरच्या टास्क फोर्समध्ये समावेश

कोरोनोचा प्रादुर्भाव काश्‍मीरमध्ये २ लाख ॲक्टीव्ह केसेस आहेत. तर जम्मूमध्ये १ लाख २२ हजार ॲक्टीव्ह केसेस आहेत. या बाधीतांवर उपचार करण्यासाठी तेथील आरोग्य यंत्रणा तर रात्रंदिवस कार्यरत आहेत. सोबतच आता डेल्टा प्लस, म्यूकोरमायकोसिस’ असे विविध व्हेरियंट निघत आहे. कोरोना आपले रूप बदलत आहे. याचा अभ्यास डॉ.धमेंद्र पाटील करतात. यामुळे त्यांना व्हेरियंटची माहिती असते. यामुळे जम्मू, काश्‍मिरच्या टास्क फोर्समध्ये महाराष्ट्रीयन सल्लागार म्हणून डॉ.पाटील कार्यरत आहेत.

रूग्णांची लक्षणांनुसार मार्गदर्शन

मोबाईल गृपवर जिल्हा स्तरावरील मोठे अधिकारी आरेाग्य यंत्रणेचे अधिकारी, डॉक्टर तज्ञ कार्यरत आहेत. ते तेथील रूग्णांची लक्षणे सांगून संबंधित रुग्ण कोणत्या आजारात मोडतो, त्यावर उपचाराची कार्यपध्दती कशी असावी, कोणत्या स्टेजला काय करावे आदी माहिती डॉ.पाटील यांना विचारली जाते. तेही अभ्यासपूर्ण माहिती गृपवर टाकतात, वेळप्रसंगी फोनद्वारेही सल्ला देतात. जम्मू काश्‍मीरमध्ये प्रत्यक्ष जावून रुग्ण सेवा करू शकत नाही, किमान तेथील डॉक्टरांना, कोअर टीमला आरेाग्य विषयक मार्गदर्शन करू शकतो, याबाबत डॉ.पाटील यांना देशसेवा केल्याबद्दल समाधान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT