Devendra Fadnavis Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Statement: तोंड काळे केले नसते तर झेंडे दाखवायची वेळ आली नसती; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा खडसेंवर हल्लाबोल

तोंड काळे केले नसते तर ही वेळ आली नसती; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा खडसेंवर हल्लाबोल

संजय महाजन

जळगाव : आम्ही अशा काळे झेंडे दाखवणार यांना घाबरत नाही. काळे झेंडे दाखवून काय मिळणार आहे. खडसेंना आता नवीन मालक मिळाला आहे. परिवारात राहिले असते व जमिनीत तोंड काळे केले नसते तर आज काळे झेंडे दाखवण्याची वेळ खडसे यांच्यावर आली नसती; अशा शब्‍दात (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Eknath Khadse) एकनाथ खडसे यांच्यावर हल्लबोल केला. (Live Marathi News)

जळगावात आज होत असलेल्‍या शासन आपल्‍या दारी या कार्यक्रमानिमित्‍ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. (Jalgaon) विमानतळावर मंत्री गिरीश महाजन यांच्या तर्फे देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी माध्‍यमांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्‍तर देताना उपमुख्‍यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

जनता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी

मोदीजी यांच्यामुळे देशभरात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहिले, तर अनेक घोटाळे बाहेर येतील. आपले सांगाडे बाहेर येतील हे लक्षात आल्यामुळे विरोधक सर्व एकत्र आले असल्‍याचा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.

अनिल परब गुन्हा दाखलवर बोलले फडणवीस

ज्यांनी अशा प्रकारचं काम केलं आहे. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. तुम्‍ही कोणत्या पक्षाचे व्यक्ती आहे हे महत्त्वाचे नाही. कायदा कोणीही हातात घेऊ शकत नाही. त्यामुळे कारवाई ही प्रत्येकावरच होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT