Ramdas Athawale News: मुक्तींपेक्षा फडणवीसांच्या मांडीला मांडी लावायला हवी होती; रामदास आठवलेंचे उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुक्तींपेक्षा फडणवीसांच्या मांडीला मांडी लावायला हवी होती; रामदास आठवलेंचे उद्धव ठाकरेंवर निशाणा
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam tv
Published On

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : उद्धव ठाकरे मुक्तींच्या मांडीला मांडी लावून बसले. यापेक्षा त्‍यांनी फडणवीसांच्या मांडीला मांडी लावायला पाहीजे होती व मला बाजूला उभं केलं असतं तर एवढे आमदार फुटले नसते. त्यांच्यावर (Shirdi) ही गंभीर परीस्थिती आली नसती; असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मांडले. (Latest Marathi News)

Ramdas Athawale
Eknath Khadse Statement: मुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी अधिकारींवर दबाव; एकनाथ खडसेंचा आरोप

शिर्डी येथे कार्यक्रमानिमित्‍ताने मंत्री रामदास आठवले हे आले होते. यावेळी त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. आठवले यांनी सांगितले, की उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस– राष्ट्रवादीसोबत जाणे नाईलाज होता. परंतु, ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपली भुमिका बदलली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापासून ते दूर चालले आहे. त्यामुळे येत्‍या निवडणूकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

Ramdas Athawale
Dhule News: धुळे शहरासह परिसरात पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला

मोदी विरोधी गठबंधनावर टिका

सतरा विरोधक एकत्र आले काय आणि शंभर आले काय त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. जेवढे जास्त एकत्र येतील तेवढी लोकप्रियता मोदींची वाढणार आहे. विरोधक एकट्या मोदीं विरोधात अकांडतांडव करताहेत. मोदी सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहेत. विरोधकांची मोदी हटाव अशी भुमिका आहे. त्यांची भुमिका मोदी हटाव आमची भुमिका विरोधक कटाव असल्‍याचे सांगत आपल्या खास शैलीत आठवलेंची मोदी विरोधी गठबंधनावर टिका केली. तसेच २०२४ ला मोदीच पंतप्रधान होतील आणि साधारण ३५० जागा मिळतील असा आठवलेंचा दावा आहे.

Ramdas Athawale
Dharashiv News: शिक्षणाधिकारींच्या दालनातच ग्रंथपालाने अंगावर टाकले पेट्रोल; जुन्‍या पेंशनसाठी आत्मदहनाचा प्रयत्न

बीआरएस पार्टीचा महाराष्‍ट्रात काही फरक नाही

चंद्रशेखर राव यांचे बरेच बोर्ड महाराष्ट्रात दिसत आहेत. अशी नविन पार्टी येवून महाराष्ट्रात काही फरक पडणार नाही. त्यांना फारशी मतं मिळणार नाही. नविन पक्ष आला की इकडचे तिकडचे लोक पक्षात जातात. बीआरएस पार्टी तेलंगणाची आहे त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फरक पडणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com