Leopard Death Saam tv
महाराष्ट्र

Leopard: अजिंठा लेणी डोंगररांगेत बिबट्याचा मृत्यू

अजिंठा लेणी डोंगररांगेत बिबट्याचा मुत्यु

साम टिव्ही ब्युरो

तोंडापूर (जळगाव) : तोंडापूर (ता. जामनेर) परिसराला लागून असलेल्या वरखेडी (ता. सोयगाव) शिवारातील कपाशीच्या शेतात पाच वर्षीय बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. (Jalgaon News Ajintha leopard Death)

वरखेडी खु. शिवारातील गट क्र ४५ मधील शेतकरी गंगाबाई रघुनाथ जाधव (रा. हरीनगर तांडा, ता. जामनेर) यांची शेती आहे. त्यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळला. याबाबत त्यांनी सदरची माहिती गावचे पोलीस पाटील सिताराम नाईक यांना दिली. त्यांनी वन कर्मचारी अजिंठा व गोद्री जामनेर व क्रुष्णा महाकाळ यांना दिली. जामनेर वनविभाग व अजिंठा वन विभागाचे कर्मचारी यांनी पाहणी केल्‍यानंतर सदर बिबट्या अजिंठा लेणी हद्दीत असल्याने त्यांनी अजिंठा वन विभागाला कळविले. यावरुन वनपरीक्षेत्र अधिकारी अजिंठा निलेश सोनवणे यांच्यासह अजिंठा वन परीक्षेत्राचे वनपाल एच. एच. सय्यद, पी. के. शिंदे, एस. व्ही. गवंडर तसेच वनरक्षक जाधव व इतर कर्मचारी घटना स्थळावर दाखल होऊन पंचनामा करत मृत बिबट्या ताब्यात घेतला.

बिबट्याचे शवविच्‍छेदन करत दहन

बिबट्याचे वय अंदाजे पाच ते साडेपाच वर्षे असून वजन ६० किलो आहे. सदर प्रकरणात पंचनामा करून वन गुन्हा नोंद केला. त्यानंतर वनपरीक्षेत्र कार्यालय अजिंठा येथे मृत बिबट्यावर डॉ. रमण इंगळे, डॉ. नौशाद शहा व डॉ. राकेश चव्हाण या तीन पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथकाकडून शवविच्छेदन करण्यात आले. मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. सदरची कायदेशीर प्रक्रिया मुख्य वनसंरक्षक औरंगाबाद वनवृत्त सत्यजित गुजर. उपवनसंरक्षक औरंगाबाद वनविभाग सूर्यकांत मंकावार व सहाय्यक वनसंरक्षक पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परीक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे. वनपाल सय्यद शिंदे, श्री. गवंडर आदींनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT