Jalgaon News Heat Stroke Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: पाचोऱ्यात शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू?; शेतात काम करताना आली चक्‍कर

Heatstroke in Pachora: पाचोऱ्यात शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू?; शेतात काम करताना आले चक्‍कर

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथील ३६ वर्षीय शेतमजुराचा शेतात काम करत असताना चक्कर येऊन पडून (Death) मृत्यू झाला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. (Tajya Batmya)

प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (Jalgaon News) असे मृत शेतमजुराचे नाव असून, ते मिळेल ते शेतीमजुरीचे काम व जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान, सोमवारी (ता. १०) सकाळी शेती कामासाठी गेले असता दुपारी शेतात काम करताना चक्कर येऊन खाली पडले व त्यांची शुद्ध हरपली.

सोबतच्या मजुरांनी त्यांना सावलीत आणून तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची हालचाल होत नसल्याने तातडीने पिंपळगाव हरेश्वर येथे चव्हाण यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मयत प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. घरातील करता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबीय कमालीचे खचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Special Outfit: लेहेंग्यापासून साडीपर्यंत...; लग्नसराईत या आऊटफिटमुळे मिळेल एक ग्लॅमरस लूक

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Shocking News : कबड्डी खेळताना खेळाडू मैदानात कोसळला अन् मृत्यू झाला , धक्कदायक कारण आलं समोर

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

SCROLL FOR NEXT