Jalgaon News Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: अंगणवाडीच्‍या पोषण आहारात मृत पाल; आसोदा गावातील धक्‍कादायक प्रकार

अंगणवाडीच्‍या पोषण आहारात मृत पाल; आसोदा गावातील धक्‍कादायक प्रकार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शालेय पोषण आहार निकृष्‍ट दर्जाचा असल्‍याच्‍या अनेक तक्रारी आहेत. यात अंगणवाडीमार्फत गरोदर माता व त्यांच्या बालकांना दिल्‍या जाणाऱ्या (Poshan Aahar) पोषण आहाराच्या सील बंद पॅकेटात मृत पाल आढळून आली. हा धक्‍कादायक प्रकार आसोदा येथील अंगणवाडीत आढळून आला आहे. (Tajya Batmya)

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवठस केला जातो. या माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या मुलांनाही पोषण आहार दिला जातो. त्याचप्रमाणे जळगाव तालुक्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येत असलेल्‍या‍ सील बंद पोषण आहाराच्‍या पाकिटात मृतपाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

चना, मूगडाळीचे घेतले नमुने

सदर तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले आहेत. तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणात चौकशी करण्यात येवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप पंतगे यांनी दिली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया (Pankaj Aashiya) यांच्याकडे देखील संबंधितांनी तक्रार केली असून याप्रकरणी पुरवठादाराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे कोथरूडचे ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपमध्ये अंतर्गत राडा का झाला? आयारामांचा प्रवेश की आणखी काही...

SCROLL FOR NEXT