crime news 
महाराष्ट्र

मी खून केलाय..दारूच्‍या नशेत बडबडला; पोलिस चौकशीत आठ वर्षापुर्वीचा उलगडा

मी खून केलाय..दारूच्‍या नशेत बडबडला; पोलिस चौकशीत आठ वर्षापुर्वीचा उलगडा

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : आठ वर्षांपूर्वी अमळनेरात झालेल्या खुनाचा उलगडा झाला असुन अमळनेर पोलिसांनी सुरत येथून वाल्मिक चौधरी या आरोपीला ताब्यात घेतले असून हा गुन्हा फायनल झाला असल्याने न्यायालयाच्या परवानगीने त्याला अटक करण्यात येणार आहे. (jalgaon news crime news I have committed crime Police investigation reveals eight years ago)

सदर संशयीत आरोपी हा दारूच्या नशेत मी खून केलाय, मी खून केलाय अशी बडबड करत असल्याने सुरत पोलिसांनी चौकशीला सुरवात केली. मूळचा कुसुंबा (ता.धुळे) येथील असलेला वाल्मिक रमेश चौधरी हा आईसोबत सुरतमधील (Surat) पांडेसरा भागात राहत होता. त्याच भागात उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) अशोक यादव नावाची व्यक्ती राहत होती. अनैतिक संबंधांवरून अशोक यादव हा वाल्मिक चौधरीची आई लताबाई हिला त्रास देऊ लागला होता. ही बाब वाल्मीकला खटकत होती. त्याने अशोक ला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अशोक नेहमीच वाल्मिक व त्याच्या आईला त्रास देत असल्याने त्याने आपले मित्र पिंटू आणि भैय्या यांना पाच हजार रुपये देऊन अशोकला धमकवण्याचा प्लॅन केला.

अमळनेरला झाली होती अकस्‍मात मृत्‍यूची नोंद

वाल्मीकने अशोकशी मैत्री केली आणि दोन्ही मित्रांच्या मदतीने त्याला दारू पाजत सुरत येथून अमळनेर आणले. अमळनेर (Amalner) आल्यावर मंगळग्रह मंदिराच्या लघु सिंचन नाल्याजवळ अशोक आणि वाल्मिक यांची बाचाबाची झाली. त्यातून दगडांनी ठेचून अशोकचा खून केला होता. दरम्यान १८ मे २०१४ रोजी सायंकाळी सहाच्‍या सुमारास तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना एक अनोळखी प्रेत पडलेले असल्याची माहिती मिळाली होती. मयत व्यक्ती ३५ वर्षीय अनोळखी असून त्याच्या उजव्या हातावर लता लव असे लिहिलेले होते. पोलिसांनी तपास केल्यानन्तरही मयत व्यक्ती व मारणारा यांची ओळख पटलेली नव्हती. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून नंतर खुनाचा गुन्हा (Crime) दाखल होऊन गुन्हा अ फायनल करण्यात आला होता.

सुरत पोलिसांकडून चौकशी

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी वाल्मिकने दारूच्या नशेत सुरत येथे खून केल्याची बडबड केली अन्‌ हीच चूक त्याला भोवली. सुरत पोलिसांनी (Surat Police) त्याच्या वक्तव्याची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेऊन खात्री केली. एक व्यक्ती २०१४ मध्ये मयत आढळली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलीस नाईक डॉ. शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे यांच्या पथकाला पाठवून सुरत येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे. गुन्हा अ फायनल झाल्याने न्यायालयाच्या परवानगीने त्याला अटक करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT