tortured 
महाराष्ट्र

चार वर्षीय चिमुकलीवर अत्‍याचार; चाळीसगावातील घटना

चार वर्षीय चिमुकलीवर अत्‍याचार; चाळीसगावातील घटना

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : अल्पवयीन चार वर्षीय मुलीवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी (Chalisgaon City Police) आरोपीला ताब्यात घेतले आहे.

चाळीसगाव (Chalisgaon) शहरातील चार वर्षीय मुलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो असे सांगून चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला. यानंतर त्‍या चिमुकलीवर अत्याचार केल्याची थरारक घटना शनिवारी रात्रीच्‍या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संशयीत आरोपी हा पिडीतांचा लांबचा नातेवाईकच असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

संशयीत ताब्‍यात

दरम्यान चार दिवसांपूर्वीच घडलेली घटना अजून ताजी असताना चिमुकल्‍या मुलीवर अत्‍याचार झाल्‍याच्‍या घडलेल्या या घटनेने चाळीसगाव हादरून गेले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी सावळाराम भानुदास शिंदे (रा. लोंढरे, ता. नांदगाव जि. नाशिक) यास ताब्यात घेतले असून त्याच्‍या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT