Jalgaon corona 
महाराष्ट्र

सिरो सर्व्हेचा अहवाल..दुसऱ्या लाटेत ५१ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

सिरो सर्व्हेचा अहवाल..दुसऱ्या लाटेत ५१ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५१ टक्के सर्वसामान्य नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडीज तयार झाल्याने त्यांना कोरोना होऊन गेला. मात्र ॲन्टिबॉडीजमुळे त्यांना त्रास झाला नाही, तर आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ८९ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये ॲन्टिबॉडीज तयार झाल्या आहेत, असे सिरो सर्व्हेद्वारे केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. पहिल्या लाटेत २५.९ टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला होता. दुसऱ्या लाटेत नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. (jalgaon-news-corona-update-Siro-survey-report-In-the-second-wave- 51-percent-citizens-were-infected-with-corona)

नवी दिल्ली येथील ‘आयसीएमआर’ (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद)तर्फे ‘सिरो सर्व्हे’अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ४१४ सर्वसामान्य नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यात २११ नागरिकांमध्ये (५१ टक्के) ॲन्टिबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले. सोबतच आरोग्य क्षेत्रातील १०० कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यात ८९ कर्मचाऱ्यांमध्ये (८९ टक्के) ॲन्टिबॉडीज आढळून आल्या. ॲन्टिबॉडीज तयार झालेल्यांना कोरोना होऊन गेला, मात्र त्यांना लक्षणे आढळली नाहीत. म्हणजेच त्यांची इम्युनिटी पावर चांगली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पहिल्यांदा झाला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सर्व्हे

‘आयसीएमआर’तर्फे कोरोनाच्या पहिल्या लाटेत याअगोदर दोन वेळा सिरो सर्व्हे झाला. त्यातील दुसऱ्या सर्व्हेत २५.९ टक्के नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडीज तयार झाल्या होत्या. पहिल्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करण्यात आला नव्हता. आता दुसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सर्व्हे झाला. त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ८९ टक्के ॲन्टिबॉडीज आढळल्या, तर सर्व सामान्य ५१ नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडीज आढळल्या.

जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांची इम्युनिटी पॉवर वाढली असल्याने सिरो सर्व्हेत ५१ टक्के नागरिकांमध्ये ॲन्टिबॉडीज तयार झाल्या. ही जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे. प्रत्येकात इम्युनिटी वाढली पाहिजे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिल्यांदा सर्व्हे झाला आहे.

– डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; वादळी वाऱ्याने कोसळले पोस्टर

Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मच्छीमारांना मिळणार वीज सवलत, फक्त ठेवली महत्वाची अट

Maharashtra Live News Update: पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

खोबरं काढणं आता सोप्पं! साऊथस्टाईल १ सोपी टीप; सेकंदात फुटेल नारळ

SCROLL FOR NEXT