विघ्नहर्त्याने  
महाराष्ट्र

दिलासादायक..विघ्नहर्त्याने तारले; दहा दिवसांत अवघे दहा नवे बाधित

दिलासादायक..विघ्नहर्त्याने तारले; दहा दिवसांत अवघे दहा नवे बाधित

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गणेशोत्सवात प्रतिष्ठापना झालेल्या विघ्नहर्त्याने कोरोना संसर्गाचे विघ्न बर्यापैकी नियंत्रणात ठेवल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. उत्सवातील दहा- अकरा दिवसांत अवघे १० नवे रुग्ण समोर आले, तर त्या तुलनेत २७ रुग्ण बरे झाले. (jalgaon-news-corona-update-ganesh-festival-ten-days-ten-new-positive-patient)

गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरु असून त्यामुळे यंदा सलग दुसर्या वर्षी गणेशोत्सवावर विरजन पडले. दुसर्या लाटेनंतर मे महिन्यापासून संसर्ग कमी व्हायला सुरवात झाली. जुलै, ऑगस्ट महिन्यात नव्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. गणेशोत्सव धडाक्यात साजरा होणार, अशी स्थिती असताना संभाव्य तिसर्या लाटेचा धोका म्हणून उत्सवावर यंदाही निर्बंध आलेत. त्या स्थितीतही गणेशभक्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साधेपणाने पण, तेवढ्याच श्रद्धा-भक्तीने उत्सव साजरा केला.

विघ्नहर्त्याने केले विघ्न दूर

काही वैद्यकीय संस्था, संघटनांनी सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवला होता. मात्र, गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेत गर्दी होऊनही कोरोना संसर्ग नियंत्रणात राहिला. विघ्नहर्त्याने कोरोनाच्या संसर्गाचे विघ्न पूर्णपणे नियंत्रणात ठेवले. जळगाव जिल्ह्यात उत्सवातील गेल्या १० दिवसांत अवघे १० नवे रुग्ण आढळून आले, तर या दिवसांत २७ रुग्ण बरे झालेत. या दहा दिवसांत तब्बल चार दिवस एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. उर्वरित ६ दिवसही प्रत्येकी १-२ रुग्णच समोर आले. उत्सवापूर्वी जवळपास तीसच्या घरात असलेली जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या उत्सव संपल्यानंतर अवघ्या १० पर्यंत मर्यादित राहिली.

अशी राहिली स्थिती

तारीख----- नवे रुग्ण-- बरे झालेले

१० सप्टें.---२--------२

११--------२----------२

१२---------३---------४

१३---------०---------३

१४---------१---------२

१५---------१---------१

१६---------०---------२

१७----------२--------०

१८---------०--------३

१९--------०--------५

२०--------१--------३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शितल तेजवानी पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर

Tejashri Pradhan: सुंदर अन् सालस तेजश्री प्रधान, फोटो पाहतच राहाल

Face Care: थंडीच्या दिवसात ओठांभोवती काळसरपणा येतोय? या घरगुती स्क्रबने लगेच होईल त्वचा उजळ

Tejaswini Lonari Wedding : "नवरी नी नवऱ्याची स्वारी..."; सरवणकरांचा लेक अडकला लग्न बंधनात; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत आयुष्याची नवीन इनिंग

'तुम्ही भाजपला विकल्या गेले..' अधिकाऱ्याचा मतदान केंद्रावर सावळा गोंधळ; काँग्रेस नेत्या संतापल्या, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT