Jalgaon Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Corona Update: भुसावळात आढळला कोरोनाचा रुग्ण; सहा महिन्‍यानंतर पहिला रुग्ण

भुसावळात आढळला कोरोनाचा रुग्ण; सहा महिन्‍यानंतर पहिला रुग्ण

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या जळगाव जिल्ह्यात बुधवारी (१५ मार्च) कोरोनाचा (Corona) एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. हा रुग्ण भुसावळ (Bhusawal) येथील असून त्याला कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळून आलेली नाहीत. (Letest Marathi News)

कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात भुसावळ तालुका हा कोरोना हॉटस्‍पॉट ठरला होता. मात्र ही लाट ओसरल्‍यानंतर कोरोनाग्रस्‍तांची संख्‍या देखील कमी झाली. आता गेल्‍या सहा महिन्‍यांपासून जिल्‍ह्यात एक देखील कोरोनाचा रुग्ण नव्‍हता. परंतु, सध्‍या राज्‍यातील अनेक भागांमध्‍ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्‍या अनुषंगाने आता टेस्‍ट सुरू केल्‍या असून यात भुसावळ एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्‍ह आढळून आला आहे.

४४ नमुने निगेटीव्‍ह

दरम्‍यान जिल्‍ह्यात बुधवारी ४५ आरटीपीसीआर तपासण्यांपैकी ४४ नमुने निगेटिव्ह आले. तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले असल्याने या रुग्णाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली. तरी देखील रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल्पसंख्यांक संस्थांना पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त करणे बंधनकारक नाही, हायकोर्टाचा निर्णय

माहूर घाटात टेम्पो दरीत कोसळला, ३ भाविकांचा मृत्यू, ५ गंभीर; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला

Brown Egg Vs White Egg: तपकिरी की सफेद, कोणती अंडी आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक?

Shocking: शाळेमध्ये अंदाधुंद गोळीबार, ३ विद्यार्थी आणि शिक्षकाचा मृत्यू

Petrol Diesel : दिवाळीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; तुमच्या खिशावर होणार का परिणाम?

SCROLL FOR NEXT