Jalgoan Congress Saam tv
महाराष्ट्र

भाजप सरकारचे केले राम नाम सत्‍य है..; मोदींचा पुतळा दहन करत कॉंग्रेसचे निदर्शने

भाजप सरकारचे केले राम नाम सत्‍य है..; पंतप्रधान मोदींचा पुतळा दहन करत कॉंग्रेसचे निदर्शने

संजय महाजन

जळगाव : पेट्रोल– डिझेलचे वाढते दर तसेच वाढत्‍या महागाई विरोधात कॉंग्रेसच्‍यावतीने आज जळगावात आंदोलन करण्यात आले. तसेच प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या पुतळ्याचे दहन करण्यात आले. (jalgaon news congress protests burning PM Modi's statue)

पेट्रोल (Petrol)– डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मुडले असून पेट्रोल ११६ रुपये आणि डिझेलने शंभरचा आकडा गाठला आहे. यामुळे दैनंदिन जीवनातील वस्तूच्या किंमती देखील वाढत असून याची झळ सर्वसामन्य नागरिकांना बसत आहे. यामुळे आज जळगावात (Jalgaon) काँग्रेसच्यावतीने वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या किंमती विरोधात निदर्शने करत काँग्रेस (Congress) भवनापासून प्रतिकात्मक स्वरूपात अंत्ययात्रा काढली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे टॉवर चौकात दहन करण्यात आले.

भाजप सरकारचे राम नाम सत्‍य है..

कॉंग्रेसच्‍या कार्यकत्‍र्यांनी जोरदार निदर्शने करीत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या पुतळ्याचे दहन करत भाजप सरकार राम नाम सत्‍य है..अशी घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Drink: महागड्या स्किन केअरपेक्षा आठवड्यातून ४ दिवस प्या 'हे' होममेड ड्रिंक; मिळेल सॉफ्ट आणि ग्लॉईंग स्किन

थांबायचं नाही! ठाकरे बंधूंना भाजपकडून जबरदस्त धक्का, बड्या नेत्यांनी धरली भाजपची वाट

५ महिला आणि २ बालके सहस्रकुंड धबधब्यात अडकले; पाहा थरारक VIDEO

Shocking : प्रेमाचा भयंकर शेवट! जंगलात सापडला तरुण-तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, हत्या की आत्महत्या?

Dream Astrology: स्वप्नात उडताना पाहणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय मिळतात संकेत?

SCROLL FOR NEXT