Gram Panchayat Election Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election: रावेर तालुक्‍यात बारापैकी आठ ग्रामपंचायतीवर काँग्रेस पॅनलचे वर्चस्व

रावेर तालुक्‍यात बारापैकी आठ ग्रामपंचायतीवर काँग्रेस पॅनलचे वर्चस्व

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एक जागा बिनविरोध आली. तर तालुक्‍यातील बारा ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) झालेल्‍या निवडणुकीत कॉग्रेस व राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने (Congress) वर्चस्‍व राखले आहे. यात कॉंग्रेसने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्‍व राखले आहे. (Jalgaon News Gram Panchayat Election)

जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यातील रावेर (Raver) तालुक्‍यातील बारा ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्‍या होत्‍या. यात एक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्‍याने 11 ग्रामपंचायतींच्‍या झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. रावेर येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या मतमोजणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती व या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता मात्र अवघ्या काही तासात अकराही ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला.

फक्‍त राष्‍ट्रवादी, कॉंग्रेस

काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत बारा पैकी 8 ग्रामपंचायतीवर काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी करण्यास यश मिळवले आहे. तर 4 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. विजयानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. तर भाजप, शिवसेनेला तालुक्‍यात वर्चस्‍व राखता आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतूकीसाठी अनेक रस्ते बंद

Mumbai News: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, हात सटकला अन् नाल्यात पडला

Shivali Parab Look: शिवाली परबचा किलर वेस्टर्न लूक; व्हाइट-ब्राउन आउटफिटमधला ग्लॅमरस अंदाज

Kandyache Thalipith : सकाळच्या नाश्त्यासाठी भारी पर्याय! 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत कांद्याचं थालिपीठ

Kitchen Tips : फोडणी दिल्यानंतर सतत ठसका लागतो? 'हे' 6 उपाय करून पाहा जरासुद्धा येणार नाही खोकला

SCROLL FOR NEXT