Jalgaon Fraud Case
Jalgaon Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud: पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : अवघ्या सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून एका शेतकऱ्याची चार लाखांत फसवणूक (fraud) केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील उंबरखेडे येथे १४ सप्‍टेबरला उघडकीला आली. या प्रकरणी (Chalisgaon) चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon News Fraud Case)

चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेडे येथील (Farmer) पुंडलिक डौलत पाटील (वय ६२) हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, पुंडलिक पाटील यांना २०१० मध्ये एकाने फोनवर कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करून सहा महिन्यात आपले पैसे दुप्पट करून देतो, असे सांगितले. गुंतवणूक करायची असेल तर संबंधित क्रमांकावर फोन करण्यास सांगितले. त्यानंतर पाच दिवसांनी या क्रमांकावर फोन करून पाटील यांनी पैसे गुंतवणूक करण्याबाबत होकार दिला. यानंतर संबंधितांनी अक्सीस बँकेचा (Bank) अकाउंट क्रमांक पाठवून यावर नोंदणी करण्यासाठी सांगितले. त्यावर पाटील यांनी तत्काळ २ हजार रुपये देऊन नोंदणी केली.

चार वेळेस पाठविली रक्‍कम

त्यानंतर पाटील यांनी सलग चार वेळा विविध कारणांसाठी एकेक लाख रुपये संबंधिताच्या खात्यावर वर्ग केले. याबाबत पाटील यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली तर आजपर्यंत संजय विठोबा उमाटे (रा. प्रगतिशील कॉलनी, वर्धा रोड, नागपूर) नामक व्यक्तीचा तपास लागलेला नसून तो पैसे घेऊन पसार झाला आहे. आपली फसवणूक झाल्याचे कळताच पुंडलिक डौलत पाटील यांनी १४ सप्टेंबर २०२२ ला दुपारी एकच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलिस ठाणे गाठून वरील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

SCROLL FOR NEXT