NCP
NCP Saam tv
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना साडी, बांगड्यांचा आहेर; पाचोऱ्यात निषेध

संजय महाजन

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा पाचोरा येथे राष्‍ट्रवादी (NCP) महिला आघाडीतर्फे निषेध करण्यात आला. (jalgaon news Chandrakant Patil protest in Pachora on NCP)

पाचोरा (Pachora) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्‍या प्रतिकात्मक फोटोला चपला मारो आंदोलन करत फोटोला साडी, बांगड्या, टिकली लावत जाहीर निषेध करण्यात आला. तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार (Jalgaon News) घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा योजना पाटील, तसेच तालुक्यातील सर्व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आंदोलनानंतर चंद्रकांत पाटील यांना साडी, बांगड्या व टिकलीचा आहेर पोस्टाने पाठविण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

Sambhajinagar News: प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची ‎कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी, मायलेकांना जन्मठेप

Special Report : नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT