mla mangesh chavan
mla mangesh chavan 
महाराष्ट्र

आमदार पार पाडणार ‘मामा’चे कर्तव्य; आशा, अंगणवाडी सेविकेच्या मुलीच्या लग्नासाठी २५ हजारांची मदत

संजय महाजन

जळगाव : प्रतिकूल परिस्थितीत व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या तालुक्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडीच्या सेविका व मदतनीसांना त्यांच्या एका मुलीच्या लग्नासाठी २५ हजारांची आर्थिक मदत करुन आपल्या भाचींसाठी ‘मामा’ म्हणून कर्तव्य पार पाडण्याचे आश्‍वासन चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी दिले. (jalgaon news chalisgapn MLA mangesh chavan 25 thousand help for Asha Anganwadi worker's daughter's wedding)

चाळीसगाव (Chalisgaon) येथील शिवनेरी फाउंडेशनतर्फे आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासाठी नुकताच भाऊबीज (Bhaubij) सोहळा पार पडला. या सोहळ्याला शहरासह तालुक्यातील एक हजार ३०० हून अधिक आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या. सर्व सेविका सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यातही अनेक विधवा, परितक्त्या, निराधार असतात. त्यामुळे त्यांचा भाऊ म्हणून जबाबदारी स्वीकारताना वर्षभरात अनेक बहिणींच्या अडचणी आपल्याला जाणून घेता आल्या असे सांगून आमदार मंगेश चव्हाण यांनी शासन त्यांचे मानधन वाढवेल तेव्हा वाढवेल. यासाठी आमदार म्हणून मी पाठपुरावा करीनच. मात्र, या सर्वांचा भाऊ म्हणून देखील मी त्यांचे काही तरी देणे लागतो. या भावनेतून या वर्षांपासून आशा, अंगणवाडी सेविका, मदतीनासांच्या एका मुलीच्या लग्नासाठी २५ हजार रुपयांची मदत करण्याची ग्वाही आमदार चव्हाण यांनी दिली.

सोहळ्यातच भाऊबीज

आमदार मंगेश चव्हाण यांच्या मनोगतानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आमदार चव्हाण यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली गेली. यावेळी शिवनेरी फाउंडेशनच्यावतीने सर्व आशा-अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना साडी भेट देण्यात आली. लाडक्या भाऊ, भावजयीसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वांची एकच झुंबड उडाल्याचे यावेळी पाहण्यात आले. यावर्षी काही कारणांमुळे उशीर झालेला असला तरी पुढच्यावर्षी मात्र दिवाळी भाऊबीजनंतर ४ ते ५ दिवसात हा कार्यक्रम घेतला जाईल असे त्यांनी जाहीर केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SCROLL FOR NEXT