Mangesh chavan 
महाराष्ट्र

भाजप आमदारासह शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल; जमावबंदीचे उल्‍लंघन

भाजप आमदारासह शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल; जमावबंदीचे उल्‍लंघन

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : शामिगोंडा स्पर्धा (बैलगाडा शर्यत) पूर्वीसारखी सुरू करावी, या मागणीसाठी बैलगाडीचालक, मालक व शेतकऱ्यांनी ‘एल्गार’ करीत सर्जाराजाला सोबत घेऊन भव्य मोर्चा काढला होता. मोर्चा काढून गर्दी जमविल्याप्रकरणी चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह १०० ते १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-chalisgaon-police-Crimes-filed-against-more-than-people-including-BJP-MLA-mangesh-chavan)

बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्‍या मोर्चात नाशिक, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातील बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर आदी तालुक्यांतील बैलगाडा शर्यतप्रेमी सहभागी झाले होते. या आंदोलनात मोठा जमाव जमला होता. कोरोनाच्‍या प्रादुर्भाव रोखण्याच्‍या अनुषंगाने जमावबंदीस मनाई आदेश आहे. असे असताना शेकडोच्‍या संख्‍येने नागरीकांचा मोर्चा काढण्यात आला होता.

जमावबंदी आदेशाचे उल्‍लंघन

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी चाळीसगाव येथे बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. यात आमदार चव्हाण हे ही सहभागी झाले होते. यात फिजिकल डिस्टनसिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे तसेच जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीनुसार आमदार चव्‍हाण यांच्यासह १०० ते १२५ आंदोलकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

स्पेसक्राफ्ट एका दिवसात किती फेऱ्या मारतं?

Crime News: बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, ३ अल्पवयीन मुलांना अटक; चोरीस गेलेल्या वस्तू जप्त

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून गेले शिंदेंचे आमदार, लाखोंची प्रॉपर्टी विकून केली मदत; पाहा VIDEO

नवी मुंबईत स्पा सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय; ६ हजारासाठी तरूणींवर दबाव, पोलिसांकडून पर्दाफाश

SCROLL FOR NEXT