Chalisgaon Heavy Rain 
महाराष्ट्र

पूर ओसरला आता पुन्‍हा घर उभारताना डोळ्यात पाणी; होते ‍ते वाहून गेले

पूर ओसरला आता पुन्‍हा घर उभारताना डोळ्यात पाणी; होते ‍ते वाहून गेले

संजय महाजन

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे गावामध्ये पूर सदृश्य परिस्थिती होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस आला मोठा अन्‌ घर गेले वाहून..असे काहीसे चित्र पाहण्यास मिळत आहे. उभा केलेला संसार पाण्यात बुडाला. आता पूर ओसरत असला तरी पुन्‍हा घर उभारताना डोळ्यात येणारे पाणी थांबत नसल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. (jalgaon-news-chalisgaon-heavy-rain-villages-people-loss-house)

चाळीसगाव तालुका व परिसरात मध्‍यरात्रीनंतर ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने गाव पाण्यात बुडाली. पशु, पक्षी पुरात वाहून गेले. सकाळपासूनच गावात बचावासाठी प्रयत्‍न सुरू झाले. दुपारनंतर पाऊस थांबल्‍याने पुराचे पाणी देखील ओसरू लागले आहे. यामुळे घरांमध्ये शिरलेले पाणी काही प्रमाणात कमी होत आहे. परंतु, नंतरचे चित्र पाहून घर सावरताना डोळ्यातील अश्रू वाहू लागले आहेत.

उपाशी पण भुकही लागली नाही

घरची परिस्थिती पाहून नागरिकांना रडू कोसळत आहे. जनावरे, कोंबड्या अनेक पशुपक्ष्यांचा यामध्ये बळी गेला आहे. अचानक आलेल्‍या पुरामुळे गावांमधील नागरीक आज सकाळपासून उपाशी पोटी आहेत. मात्र भुकेची जाणीव देखील झाली नाही. घरामध्ये सात ते आठ फुटापर्यंत पुराचे पाणी शिरल्‍याने घरात असलेले अन्नधान्य पुरामुळे वाहून गेले आहे. पाण्यात राहून तहान भागविणे पण शक्‍य नव्‍हते.

यंत्रणा पोहचली पण सुविधा नाही

प्रशासकीय अधिकारी जरी गावाला भेट देऊन गेले असले तरी अद्यापपर्यंत कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही. रात्रीपासून गेलेले विद्युत लाईट आत्तापर्यंत सुद्धा सुरळीत झालेली नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पुराचे पाणी जरी असले तरी नागरिकांना आता अनेक साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

SCROLL FOR NEXT