memu railway 
महाराष्ट्र

चाळीसगाव– धुळे मेमू दोन वर्षानंतर धावली

संजय महाजन

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून बंद केलेली चाळीसगाव- धुळे मेमू रेल्वे गाडी आजपासून (१३ डिसेंबर) पूर्ववत सुरु झाली. रेल्वे स्थानकावरून सकाळी नऊला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) पाटील यांच्‍या हस्ते ऑनलाइन व्हिडियो लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखविल्‍यानंतर रेल्‍वे धावली. (jalgaon-news-Chalisgaon-Dhule-Memu-railway-ran-after-two-years)

दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रकोपामुळे रेल्वेच्या यार्डातच उभी असलेली व सर्वसामान्यांची जीवनदायी असलेली चाळीसगाव- धुळे पॅसेंजर आजपासून (१३ डिसेंबर) पुन्हा धावली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्‍या हस्‍ते ऑनलाइन लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ झाला. यावेळी खासदार उन्मेष पाटील, खासदार सुभाष भामरे दिल्लीहुन ऑनलाइन होते. तर चाळीसगाव स्थानकावर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, धुळ्याचे महापौर करपे, आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते.

अशी असेल सेवा

दर सोमवार ते शनिवार सकाळी ६.३० वाजता चाळीसगाव येथून ही गाडी सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी सकाळी ७.३५ वाजता पोहोचेल. धुळे येथून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ८.५५ वाजता चाळीसगावला पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता धुळे जाण्यासाठी सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी सायंकाळी ६.३५ वाजता पोहोचेल आणि रात्री ८.२५ वाजता चाळीसगाव येथे पोहोचेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT