Farmer Suicide 
महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यातील अतिपावसामुळे शेतातील झालेल्या पिकांचे नुकसान झाले. यामुळे कर्ज कसे फेडावे या चिंतेत असलेल्या तांबोळा खुर्द येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (jalgaon-news-chalisgaon-Crop-damage-due-to-excess-rainfall-Farmer-suicide)

चाळीसगाव तालुक्‍यात यंदा पाच वेळेस अतिवृष्‍टीचा तडाखा बसला आहे. या अतिवृष्‍टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे. परंतु, पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्‍याने उत्‍पन्‍न शुन्‍न झाले आहे. यामुळे कर्जाचा बोजा कसा फेडायचा हा प्रश्‍न बळीराजासमोर उभा आहे.

शेतातच घेतले विष

तांबोळा खुर्द येथील परशुराम सुदाम पाटील (वय ४५) यांनी कर्जबाजारीपणाला व पिकांच्या अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून त्यांच्याच हिरापूर शिवारातील शेतात विष प्राशन करुन जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत महसूल विभागाचे तलाठींकडून पंचनामा करण्यात आला. मयत परशुराम पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT