Congress saam tv
महाराष्ट्र

पंतप्रधानांनी माफी मागावी; भाजप खासदारांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधानांनी माफी मागावी; भाजप खासदारांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत करुन देशात कोरोनाचा प्रसार केला’ असे वक्तव्य करुन महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेसची बदनामी केल्याने त्यांची महाराष्ट्राची व काँग्रेस पक्षाची माफी मागावी, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे येथील भाजपचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी आंदोलन करण्यात आले. (jalgaon news chalisgaon Congress agitation outside BJP MP unmesh patil office)

महाराष्ट्र काँग्रेस कमेटीच्या (Congress) ओबीसी सेलचे उपाध्यक्ष अशोक खलाणे यांच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आंदोलनापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून भाजपचे पंतप्रधान (Narendra Modi) असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली.

कॉंग्रेसचे मजूरांना सहकार्य

अचानक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील (Mumbai) मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या या मोठ्या शहरांमध्ये मोलमजुरी करणार्या कामगारांना उपासमारीला सामोरे जावे लागत होते. एकीकडे हाताला काम नाही आणि दुसरीकडे उदरनिर्वाहाचे साधन नाही. अशा परिस्थितीत आपल्या घरी जाण्यासाठी या मजुरांना वाहनांची सोय नसल्याने लाखोच्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले होते, हे सर्व देशाने पाहिले. संपूर्ण देशात कोरोनाचा (Corona) हाहाकार माजल्यामुळे जनता हतबल झाल्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशातील प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून वाहनांची व्यवस्था करून मजूरांना सहकार्य करून त्यांच्या घरी स्थलांतरीत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT