चाळीसगाव  
महाराष्ट्र

चाळीसगाव पुन्‍हा पुराच्‍या पाण्यात; महिनाभरात चौथा पुर

चाळीसगाव पुन्‍हा पुराच्‍या पाण्यात; महिनाभरात चौथा पुर

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : मध्‍यरात्रीनंतर चाळीसगाव परिसरात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे परिसरात पुन्‍हा पुरस्‍थीती उद्‌भवली आहे. गेल्‍या महिनाभरात चौथ्‍यांदा चाळीसगाव तालुका परिसरात पुरावा वेढा पडला आहे. डोगरी व तितुर नदीला पुर आल्याने शहरासह तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराचा वेढा आहे. यामुळे शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

कजगाव (ता. भडगाव) येथील परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचले असून संपूर्ण पिके पाण्याखाली आली आहेत. यामुळे पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकर्यांचा हाती आलेला घास हिरावला आहे. यावर्षीचा कापूस, मका, ज्वारी आदी पिकांचा खरीप हंगाम वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे तरी शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे

तितुर नदीला पुन्हा पुर

तितूर नदीला संपूर्ण सप्टेंबर महिन्यात चौथा पुर आला आहे. या पुरात कजगाव, नागद रस्त्यावरील पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक झाली आहे. पुन्हा वीस ते पंचवीस गावाचा संपर्क तुटला असून पुलाचा कच्चा भराव वाहुन गेला आहे. तसेच परिसरातील बांबरूड, गोंडगाव, कनाशी, पिप्री या भागातील नाले तुडुंब पाण्याने भरून ओसांडून प्रवाहीत होत आहेत. कनाशी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकीला अडचण निर्माण झाली आहे. तसेच येथील गोंडगाव रस्त्यावरील ब्रिटीशकालीन नाल्यावर बेकायदेशीर बांधकामे झाल्यामुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे नाल्याचे पाणी येथील घरामध्ये शिरले होते. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

SCROLL FOR NEXT