Jalgaon Congress Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Congress: कसब्यातील विजयाचा काँग्रेसतर्फे जळगावात आनंदोत्सव

कसब्यातील विजयाचा काँग्रेसतर्फे जळगावात आनंदोत्सव

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजप (BJP) पक्षाला महाराजांच्या कसब्यात जागा दाखवत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांना विजयी केले. असे म्‍हणत कसाब विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा कॉंग्रेसच्‍यावतीने(Congress) फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. (Breaking Marathi News)

पुणे कसबा पोट निवडणुकीत भाजपसाठी प्रतिष्‍ठेची होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे भरघोस मतांनी निवडून आले. या निवडणुकीत धंगेकर हे रस्तावरचे उमेदवार म्हणून उभे होते. या विजयाचा जल्‍लोष राज्‍यभरात महाविकास आघाडीकडून केला जात आहे. त्‍यानुसार जळगावात (Jalgaon) देखील कॉंग्रेसकडून फटाके फोडून जल्‍लोष केला.

भाजपला जागा दाखविली

कसबा विधानसभा मतदार संघाला गौरवशाली इतिहास आहे. याच मतदारसंघातील लालमहाल येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले आहे. त्याच पद्धतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा फुले वाडा देखील इथेच आहे. परंतु भाजपने नेहमीच महापुरुषांचा अपमान केला. त्यामुळेच आज अशा थोर महापूरूषांचे अस्तित्व असणाऱ्या मतदारसंघातील मतदारांनी भाजपला त्यांची जागा दाखवत महविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर यांना भरगोस मतांनी विजयी केल्‍याचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant: मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

Gold Rate Today : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! प्रति तोळा सोन्याचा भाव दीड लाखांवर, मुंबई पुण्यात कसे आहेत दर?

Maharashtra News Live Update : ५ हजार कोटींत शिवसेना विकली, संजय राऊतांचा आरोप

Skipping dinner and cholesterol: रात्रीचं जेवण टाळल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT