Indore Amalner Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

इंदूर बस अपघात..मृतापैकी ८ जणांची ओळख पटली; चालक– वाहकासह अमळनेर तालुक्‍यातील पती– पत्‍नीचा समावेश

मृतापैकी ८ जणांची ओळख पटली; चालक– वाहकासह अमळनेर तालुक्‍यातील पती– पत्‍नीचा समावेश

Rajesh Sonwane

जळगाव : मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या लगत नर्मदा नदीत बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्‍यू झाला आहे. या अपघातातील (Accident) मृतांची ओळख पटली असून मृतांमध्‍ये अमळनेर तालुक्‍यातील पती– पत्‍नीसह चालक व वाहकाचा समावेश आहे. (Indore Amalner Bus Accident)

जळगाव (Jalgaon) विभागातील अमळनेर डेपोची (Amalner) अमळनेर ते इंदूर बस सकाळी साडेसातला इंदूर येथून परतीच्‍या मार्गाला लागली असताना खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या खलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी होते. यात १३ प्रवाशांचा मृत्‍यू झाला आहे.

बसमधील मृत प्रवाशी

बस वाहक प्रकाश श्रवण चौधरी (वय 40, रा. शारदा कॉलनी अमळनेर), चालक– चंद्रकांत पिता एकनाथ पाटील (वय ४५, अमळनेर), चेतन राम गोपाल (जांगिड़, नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान), जगन्नाथ हेमराज जोशी (वय 70, रा. मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान), निंबाजी आनंदा पाटील (वय 60, पिळोदा अमळनेर), कमलाबाई नीबाजी पाटिल (वय 55, पिळोदा अमळनेर) या मृतांची ओळख आधारकार्डमुळे पटली आहे. तसेच अरवा मुर्तजा बोरा (वय २७, रा. मूर्तिजापुर, अकोला), सैफुद्दीन अब्बास निवासी (नूरानीनगर, इंदौर) यांची ओळख नातेवाईकांमुळे पटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT